
युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
दर्यापूर बस स्थानका समोरील डिव्हायडर ठरत आहे धोक्याची घंटा.दर्यापूर बस स्थानकाचे नविन बांधकाम चालू असल्याने आगारामधून बस बाहेर नेणे बस आत मध्ये नेणे याकरिता वाहन चालक यांना मोठ्या प्रमाणात वाहन वढविण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत असून दर्यापूर बस स्थानका समोर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
काही बसेसचे स्टेरिंग सुद्धा वाहन वळविताना कामे करत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये वाहन चालक यांना वाहन वळविताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, तो डिव्हायडर त्वरित काढून टाकण्यात यावा अशी दर्यापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा असून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मात्र याच्याकडे दुर्लक्ष आहे.