
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
स्वातंत्र्य सेनानी,महान साहित्यिक,महाराष्ट्र माऊली साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दल,वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान,समता सैनिक दल,राष्ट्रीय ओबीसी महासंघ, शिक्षक भारती,छात्रभारती आणि समविचारी संस्था, संघटना यांचे समन्वयातून राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालय चिमूर येथे आयोजित सोहळ्यात हरी मेश्राम यांना सामाजिक चेतना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघ चिमूर तालुका कार्याध्यक्ष प्रभाकर पिसे होते.प्रमुख अतिथी म्हणून वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसिद्ध विधीज्ञ ऍड.भूपेश पाटील,सामाजिक कार्यकर्ते डॉ.आशिष पाटील,सामाजिक कार्यकर्ते महादेवराव पिसे,धम्मचारी पद्मरत्न, मारोतराव अतकरे, तुळशीराम महल्ले उपस्थित होते.
साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्काराचे स्वरुप सन्मानचिन्ह,शाल आणि पुस्तक असे होते.अनेक वर्षांपासून समता सैनिक दलाच्या माध्यमातून संडे स्कूलचा उपक्रम तसेच सामाजिक प्रबोधन करणारे हरी मेश्राम यांना साने गुरुजी सामाजिक चेतना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारंभाचे प्रास्ताविक वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे यांनी केले.संचालन राष्ट्र सेवा दल तालुका कार्याध्यक्ष कैलाश बोरकर यांनी तर आभार राष्ट्र सेवा दलाचे कार्याध्यक्ष रावन शेरकुरे यांनी मानले.पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हरी मेश्राम यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.