डॉ.राजेश्वर राहांगडाले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त…

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी

          चिमूर स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचालित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.राजेश्वर राहागंडाले यांना नुकताच नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरम नंदुरबार द्वारा आयोजीत राष्ट्रीय स्तरावरील क्रांतीसूर्य महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे.

          हा पुरस्कार संचालक डॉ.गोरख देवरे मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल प्लनेट ब्यूटी क्वीन नूतन मिस्त्री यांच्या हस्ते प्राप्त झाला. या बदल गांधी सेवा शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. दिपक यावले सचिव प्रा. विनायकराव कापसे, प्राचार्य अश्विन चंदेल व उप-प्राचार्य डॉ. प्रफुल बन्सोड व प्राध्यापक वृंद तथा कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.