
रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी ठीक बारा वाजता ग्रामगीता महाविद्यालय चिमूर येथे सूर्यकला सार्वजनिक वाचनालय वडाळा पैकू यांच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनी व वाचन स्पर्धा घेण्यात आली.
त्यात वर्ग अकरावी सायन्स व कला आणि वर्ग बारावी विज्ञान कलाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन संदीप मेश्राम ग्रामगीता महाविद्यालयाचे ग्रंथपाल यांनी ग्रंथालयाचे जनक एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून ग्रंथ प्रदर्शनाची उद्घाटन करण्यात आले.
ग्रंथ प्रदर्शनी मध्ये चालू घडामोडी व आधारित विषयावर प्रकाश टाकणारे अनेक ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्यात ग्रंथ कथा कादंबरी चरित्र व्यक्तिविशेष समाजशास्त्र मानसशास्त्रीय राजकीय अर्थव्यवसायिक ग्रंथ धार्मिक ग्रंथ स्पर्धा परीक्षा चे ग्रंथ ठेवण्यात आले होते.
ग्रामगीता महाविद्यालयाचे प्राचार्य आनंदे सर.सातव सर, बांबोडे मॅडम, सोनवणे सर, लेंढे मॅडम, प्राध्यापक प्रणाली टेंभुर्णे मॅडम, प्राध्यापक माणिक सर, मुकेश घाटे सर, देसाई मॅडम, काटकर मॅडम, यांनी ग्रंथालयाचे अवलोकन केले.
त्यांनी ग्रंथायाबद्दल स्तुती केली पहिल्यांदाच एवढं चांगलं कलेक्शन बघतोय असे म्हणाले कारण ग्रंथ हे त्या पद्धतीची होती जे मुलांना प्रेरणात्मक मोटिवेशनल मांइंड देतील किंवा त्यांना उत्साहित करतील त्यानंतर त्याच महाविद्यालयात वर्ग अकरावी विज्ञान व कला वर्ग बारावी विज्ञान व कला वर्गांसाठी वाचन स्पर्धा घेण्यात आली.
त्यात एकूण 22 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्यांचा त्या स्पर्धेमध्ये एक परिच्छेद वाचून घेण्यात आला त्यात विद्यार्थ्यांची उभे राहण्याची पद्धत आवाजातील चढ उतार काना मात्रा हे मुद्दे लक्षात घेऊन त्यांना प्रथम व द्वितीय व तृतीय आणि एक प्रोत्साहन पर बक्षीस जाहीर करण्यात आले.
प्रथम बक्षीस
राधिका निखाते, सुमित मेश्राम, शुभांगी आवळे, मेघराज नन्नावरे, यांची निवड केली कार्यक्रमाचे संचालन तसेच कार्यक्रमाची जबाबदारी महाविद्यालयाचे ग्रंथपाल संदीप मेश्राम सर यांनी सांभाळली मुलांना चांगले मार्गदर्शन केले. आजचा विद्यार्थी बाहेर वेळ घालविण्यापेक्षा ग्रंथालयात वेळ घालावा हे वय लहान असतं तेवढेच तुमची आकलन शक्ती भरपूर असते जे तुम्ही या वयात अवगत कराल ते आयुष्यभर टिकत असते असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे यशस्वी करिता सूर्यकला सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल वंदना शेषकर, भावना नेवारे, वर्षा बनकर,आयशा कुरेशी, खोब्रागडे सर, मुकेश घाटे,पंदीलवार मॅडम यांनी सहकार्य केले.