दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादिका
चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता विभागातर्फे स्वच्छता कर्मचारी व वॉर्डसखींसाठी आयोजित करण्यात आलेली “ओला व सुका कचरा व्यवस्थापन” कार्यशाळा उत्साहात पार पडली.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात स्वच्छता कर्मचारी व वॉर्डसखींनी सहभाग दर्शविला.
सोमवार 30 डिसेंबर रोजी स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छ संरक्षण 2024-25 अंतर्गत भिवापूर वॉर्ड येथील तिरुमला भवन येथे झालेल्या कार्यशाळेत घर ते घर कचरा वर्गीकरण कसे करावे व कचऱ्यापासुन कंपोस्ट खत कसे तयार करावे याचे प्रशिक्षण उपस्थितांना देण्यात आले.
त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयी जागरूकता वाढावी व त्यायोगे आपले शहर,नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
स्वयंसेवकांनी स्वच्छता दूत म्हणून समाजात काम केले पाहिजे.स्वयंसेवक म्हणून प्रबोधनातून प्लास्टिक बंदी केली पाहिजे.’स्वच्छता अँप’ याविषयी माहिती देऊन वापरण्याचे आवाहन चंद्रपूर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल,अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले यांनी यावेळी केले.
स्वच्छता मोहिमेत कचरामुक्त परिसर करण्यासाठी आपण सर्वांनी करण्याचे आवाहन करत डॉ.अमोल शेळके व सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून या कार्यशाळेचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.