अहो आगार प्रमुख व्यवस्थापक साहेब एसटी बसेस सुरू कराल काय?  — बसच्या अभावी चिमुर- खंडाळा-ताडगाव- गिरड मार्गे प्रवाशांचे हाल दळणवळण करतांना वृदध व्यक्तीना तारेची कसरत शालेय विद्यार्थी यांची होत आहे पायदळवारी…  — पेठभान्सुली, खंडाळ्याच्या सरपंच सौ तुळसा श्रीरामे यांचे आगारप्रमुख व्यवस्थापकास निवेदन….

         रामदास ठूसे 

नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी

           चिमुर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या खंडाळा गावाचा समावेश पेठभान्सुली गटग्रामपंचायत मधे होतो.खंडाळा गावातील ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थी यांना शिक्षण घेण्याकरीता जीवाची बाजी लावत जंगल परिसरातून पायदळ वारी बसेस सुरू नसल्याने होत असुन यांचा त्रास नागरिकांना व गावातील ६० वर्षावरील वृद्ध व्यक्तीला अनेक दिवसांपासून औषधोपचार दवाखान्यात व बाजार हाट करीता दळणवळण पायदळ वारी करावी लागत असुन यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

          बसच्या अभावी खंडाळा-ताडगाव- गिरड मार्गे जवळपास १० खेडे गावं येत असुन दळणवळण करतांनी प्रवाशांचे हाल होत असुन होत असुन बसेस सुरू नसल्याने ६० वर्षावरील वृध्द व्यक्तीची तारेची कसरत होत आहे व शिक्षण घेण्याकरीता शालेय विद्यार्थ्यांची पायदळ वारी होतं आहे.

         त्यामुळे चिमुर बसस्थानकावरून दुपारी २ वाजता बस सेवा चिमुर- खंडाळा-ताडगाव- गिरड मार्गे पर्यन्त नियमित सुरू करण्यात यावी अशी मागणी पेठभान्सुली खंडाळ्याच्या सरपंच सौ.तुळसा देविदास श्रीरामे, सामाजिक कार्यकर्ते आकाश श्रीरामे यांनी आगार प्रमुख व्यवस्थापक धाडसे साहेब यांना निवेदनातुन केली आहे….