वनविकास महामंडळाची बेधडक कार्यवाही,सहा ट्रॅक्टर केले जप्त…

         रामदास ठुसे

नागपूर विशेष विभागीय प्रतिनिधी 

         दिनांक 30/12/2024 रोजी पहाटे 2:00 वाजता खडसंगी परिक्षेत्रातील कक्ष क्र. 26 (A) FDCM च्या जंगलात वनकर्मचारी अधिकारी गस्तीवर असतांना जंगलातून अवैध रेतीची चोरी करणारे सहा (6) ट्रॅक्टर जप्त करून कार्यवाही करण्यात आली.

              समोल चौकशीमध्ये ट्रैक्टर मालक सौ. शिला रामदास रामटेके, रा. बंदर, श्री अनिरुध देवानंद वासनिक, रा. बंदर, गौतम श्रावण वासनिक, रा. बंदर, सौ. सुनंदा गजाনন शंडे, रा. खडसंगी, श्री विशाल संजू मुदनकर, रा बंदर तसेच श्री वनवास धनराज पाटील, रा. बंदर यांचे मालकीचे आहे. पाच ट्रॅक्टर जप्त केले असून असून एक ट्रैक्टर फरार आहे.

             सदर कार्यवाही जी आय उईके, वनपाल एस व्हि खोब्रागडे, वनरक्षक, वाय डी गोटे, एम टी पातूरकर, श्री अशोक बावणे, श्री आर डी चौधरी यांनी केली. पुढील तपास ए के सोनुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी खडसंगी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.