दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : मानवनिर्मित जंगलांची वृध्दी, तापमान वाढ आणि हवामान बदल देशाला आव्हानात्मक आहे. पर्यावरण वाचवणे ही काळाची गरज असून शिक्षकांनी पुढाकार घेऊन निसर्ग व पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण चळवळ सार्वत्रिक करावी, अशी अपेक्षा आळंदी देवस्थानने प्रमुख विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केली.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या वतीने नुकतेच (दि. २९ रोजी) आळंदी येथील देविदास आश्रमशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिरात आठवे एकदिवसीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा.श्रीधर महाजन हे होते. तर उद्घाटक म्हणून आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप होते.
याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे, पुणे मनपाचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोददादा मोरे, विठ्ठल शिंदे, डॉ.सुनील वाघमारे, शिरीषकुमार कारेकर, ॲड.लक्ष्मण येळे, छायाताई राजपूत, विलास महाडिक, मनिषाताई पाटील, लतिकाताई पवार, प्रभाकर म्हस्के, अलका गव्हाणे, कांचन सावंत, बबन जाधव आदी उपस्थित होते.
याप्रसंगी निरंजनशास्त्री कोठेकर, प्रभाकर तावरे, विघ्नेशा आहेर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे यांनी आपल्या मनोगतातून पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विशद केले. या संमेलनासाठी राज्यातून २५ पेक्षा अधिक जिल्ह्यांची प्रतिनिधी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात आळंदी येथील सिद्धबेट येथे पर्यावरण प्रेमीची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती.