वणी येथील काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांकडून माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

         आज वणी तालुका कांग्रेस कमिटी तर्फे कांग्रेस पक्ष कार्यालय (माजी आमदार वामनराव कासावार यांचे निवासस्थान) येथे श्री.वामनराव कासावार यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे माजी पंतप्रधान जागतीक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांच्या दु:खुद निधनाबद्दल शोक व्यक्त करुन त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

      या कार्यक्रमाचे संचालन वणी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.घनश्याम भाऊ पावडे यांनी केले.

     याप्रसंगी माजी आमदार श्री. वामनराव कासावार यांनी अजातशत्रू डॉ.मनमोहन सिंग यांच्या बाबत एक अर्थशास्त्रज्ञ आणि पंतप्रधान असतांना केलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली.

         या कार्यक्रमाला वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार श्री.वामनराव कासावार,सौ.संध्याताई बोबडे, झरी,कृ.उ.बा.स.चे सभापती,श्री. राजीव कासावार,वणी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. घनश्याम भाऊ पावडे,ओम ठाकूर,डॉ.कावले,अनंतलाल चौधरी,मारोती गौरकार,आकाश बदकी,लक्ष्मण पोणलवार,रविन्द्र होकम,शामाताई तोटावार,विवेक मांडवकर,शालिनीताई रासेकर,अलका महाकुलकर,अशोक पांडे,संदिप बुर्रेवार,कोरडे सर,अरुणाताई खंडालकर,सुरेश बन्सोड,रुपेश ठाकरे,पंजाब कुमरे,अविनाश पानघाटे,दिनेश पाऊणकर,गोपालसिंह भदोरिया,प्रफुल्ल उपरे,दर्शना पाटील,सविता रासेकर, डॉ.आंबटकर,मंगला झिलपे, निवृत्ती ठावरी तसेच पदाधिकारी व अनेक कांग्रेस कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.