युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
राष्ट्रीय स्वच्छता अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या दर्यापूर नगरपरिषदेच्या शहरातील कचरा गोळा करणाऱ्या कचरा गाड्या सध्या कचऱ्याच्याच अवस्थेत गेले असल्याने नव्या कचरा गाड्या खरेदी करणे आवश्यक झाले असुन सध्या कार्यरत असलेल्या कचरा गाड्या ह्याच भंगार अवस्थेत दिसुन आहे.
सुमारे 10 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमध्ये स्वच्छता अभियान सुरू केले होते त्यातीलच एक भाग म्हणून दर्यापूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये कचरा गोळा करण्याचे अभियान दर्यापूर नगर परिषदेने सुरू केले होते,ते अजुन नियमित पणे सुरु आहे पण सुमारे 10 वर्षांपूर्वी त्यावेळेस दर्यापूर शहराची हद्द वाढ झाली नसल्याने ,आहे त्या स्थितीतील वाहनांना कचरा शहरातील कचरा गोळा करणे अत्यंत सोपे जात होते.
मात्र आता गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी दर्यापूर नगरपालिकेची हद्द वाढ झाल्याने शहराला लागून असलेला ग्रामिण भाग सुद्धा सध्या परिस्थितीत नगर परिषद क्षेत्र समाविष्ट झाला आहे त्यामुळे शहराचा स्वच्छता परिसर मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे एकाच प्रभागात आलटून पालटून कचरा गाड्या फिरवण्यात येत आहेत त्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग पडून राहतात.
पण नियमितपणे कचरा उचलण्याच्या प्रक्रियेला स्वच्छता विभागाला न्याय देता येत नाही ही परिस्थिती सध्या नगरपरिषद क्षेत्रामध्ये सुरू आहे करिता शहराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कचरा उचलण्याच्या प्रक्रिया मिळावी यासाठी नव्या मोठ्या आकाराच्या कचरा गाड्या खरेदी करणे नगरपरिषदला अत्यंत आवश्यक झाले आहे.
त्या दृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी अशी मागणी शहरातील नागरिक हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष ऍड. संतोष कोल्हे वतीने न.प. प्रशासनाला करण्यात आली असल्याची माहिती सचिव शरद रोहणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.