बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
नरसिंहपुर ते पिंपरी बुद्रुक परीसरात शेतकरी बांधवांनी पाचट कुट्टी केलेल्या प्लॉटला भेटी देऊन, पाचट कुट्टी केल्या पासून पिकाला मिळणारा फायदा या विषयी मार्गदर्शन करीत आसताना तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर व बावडा कृषी मंडळ प्रमुख अधिकारी गणेश सूर्यवंशी, कृषी प्रवेक्षक कल्याण पांढरे, कृषी सहाय्यक संदीप घुले. यांच्या उपस्थितीत पाचट व्यवस्थापन याविषयी महत्त्व पटवून सांगितले.
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील प्रगतशील शेतकरी व विद्यमान उपसरपंच संतोष हरिभाऊ सुतार यांच्या शेती प्लॉटमध्ये भेट देउन ऊस पाचट व्यवस्थापन काळाची गरज या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रूपनवर बोलत आसताना म्हणाले की ,
सर्व शेतकऱ्यांनी ऊस पाचट व्यवस्थापन करणे हे आज काळाची गरज आहे. ऊस पाचट व्यवस्थापन केल्यामुळे काय काय फायदा होतो.
त्यामध्ये सेंद्रिय कर्ब, तण नियंत्रण कार्बन नत्र गुणोत्तर, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश तसेच इतर मुख्य मूलद्रव्य यांची होणारी बचत होते. ऊसाच्या उत्पादनात वाढ, तसेच शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खतांचा वापरही कमी होतो, म्हणूनच शेतकऱ्यांनी ऊस तोडून गेल्या नंतर उसाचे पाचट जाळून न टाकता कुट्टी करून घ्यावे.
हीच काळाची गरज तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांचे पिंपरी बुद्रुक येथे उद्गार
तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन व एकात्मिक जल व्यवस्थापन याबद्दलही बावडा कृषी मंडल प्रमुख अधिकारी गणेश सूर्यवंशी, कृषी पर्यवेक्षक कल्याण पांढरे, कृषी सहाय्यक संदीप घुले यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी पिंपरी बुद्रुक गावचे प्रगतशील शेतकरी तथा विद्यमान उप सरपंच संतोष सुतार, संजय नरूटे, विष्णू सुतार,भालचंद्र बोडके सह पिंपरी बुद्रुक गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
शासनाच्या योजना व पाचट कुट्टी पासुन पिकाचे महत्व व फायदे पटवून सांगितल्या बद्दल तालुका कृषी अधिकाऱ्यांचे सरपंच संतोष सुतार यांनी आभार व्यक्त केले.