पळसगाव येथील प्रकाश गॅरेज मधून चोरट्यांनी लंपास केले साहित्य… — ३० हजार रुपयांचा चोरीला गेला माल..

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

       चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव (पिपर्डा) येथील प्रकाश गॅरेज मधून चोरट्यांनी रात्रीच्या वेळी ३० हजार रुपयांचे विविध साहित्य चोरुन नेल्याची घटना समोर आली.

       प्रकाश गॅरेज हे पळसगाव बस स्थानकावर असून श्री.प्रकाश उत्तम ढोक यांच्या मालकीचे आहे.

          त्यांच्या गॅरेज मधून आईल डब्बे ६०,बाईकचे टायर ५,टायर ट्यूब २५,असे साहित्य अज्ञान चोरांनी रात्रोच्या वेळी चोरुन नेल्याची गंभीर घटना घडली.

        यापूर्वी धान भरलेले पोते सुध्दा चोरांनी चोरुन नेले होते.मौजा पळसगाव परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असून त्यांच्यावर लगाम लावणे गरजेचे झाले आहे.