ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- सन २०२२ ला निर्मित जिल्हा परिषद हायस्कूल मागील शाळेच्या इमारतीला प्रत्येक वर्गात ओलावा टिकून तडे गेले आहेत. हा संतापजनक प्रकार गुरूवार ता. २५ डिसेंबरला येथे शालेय क्रीडा सत्राचा समारोप प्रसंगी लक्षात आला. तर अश्या बोगस व निकृष्ट दर्जाचे कामाने खरंच विद्यार्थी त्या भ्रष्ट इमारतीत सुरक्षित राहतील का.? असा संतप्त सवाल पालक जनतेने केला असून या बोगस शाळा इमारतीची चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
साकोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मागे सन २०२२ मध्ये प्रशस्त इमारत तयार झाली. सदर बांधकाम जिल्हा परिषद वतीने झाल्याचे बोलले जात आहे. पण या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि बोगस कामाने गुरूवार २५ डिसेंबरला हा प्रकार निदर्शनास आला. येथील वर्ग ६ वा अ, ब, वर्ग ७ वा अ, ब खोलीत संपूर्ण भिंतींना वरून तडे जात आहेत. असा कोणताच वर्ग शिल्लक नाही की तेथे ओलावा व भेगा पडल्या नाहीत, मुख्य दरवाजा वरूनही भिंत क्रॅक होत आहे. पावसाळ्यात शाळेत नविन सत्र सुरू होते.
येथे असंख्य लहान विद्यार्थी बसतात. जर ह्या अश्या बोगस कामाने वरील भाग कोसळून जीवितहानी झाली तर कोण जबाबदार.? तसे पाहिले तर शाळेतील प्रत्येक बांधकाम पारदर्शक व मजबूत व्हायला पाहिजे पण काही विभागातीलच बोगस ठेकेदारांना कमिशन जास्त लाटण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी हे विद्यार्थ्यांच्या जीवाशी जीवघेणा खेळ मांडला आहे.
या सदर इमारतीची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली असून लवकरात लवकर या इमारतीत जेथे जेथे निकृष्ट दर्जाचे कामाने तडे गेलेले आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित आणि मजबूत बांधकाम करा अशी मागणी जनतेने केली आहे. येथील गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीरपणे याची दखल घेऊन हा संतापजनक प्रकाराची चौकशी करण्याचीही मागणी पालकांनी केली आहे.