4 जुलै 1776 रोजी अमेरिकेला ( जी तेरा वसाहतींची मिळून बनलेली होती, जी पुढे चालून ती राज्ये झाली ) इंग्रजांच्या सम्राज्यातून मुक्त करुन लोकशाहीचे कट्टर समर्थक आदरणीय जॉर्ज वॉशिंगटन, आदरणीय बेंजोमीन फ्रॅंकलीन, आदरणीय थॉमस पेन ( जे म. फुले यांचे आदर्श गुरु होते ), आदरणीय थॉमस जेफरसन या चार महापुरुषांनी संपूर्ण अमेरिकन जनतेचं वैचारिक क्रांतीचे नेतृत्व स्वीकारून अमेरिकेला स्वतंत्र केलं…..
इकडे आपल्या भारतात आदरणीय म.गांधी , आदरणीय सुभाषचंद्र बोस, आदरणीय पं. जवाहरलाल नेहरू, आदरणीय मौ. अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, इत्यादी अनेक महापुरुषांनी व क्रांतिकारकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले…..
आदरणीय थॉमस जेफरसन यांनी जो अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा स्वातंत्र्ययुद्ध काळात लिहिला होता, तोच जाहीरनामा पुढे 1777 मध्ये बनलेल्या 7 कलमाच्या राज्यघटनेचा मसुदा ठरला…
इकडे आपल्या देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षते खाली निर्माण झालेल्या मसुदा समितीने दोन अकरा महिने सतरा दिवस एकट्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रात्रंदिन मेहनत घेऊन ( शारीरिक व्याधी सहन करत ) 395 अनुच्छेदाचे, 22 भागात आणि 8 परिशिष्टे असलेले……
भारताचे संविधान निर्माण केले……
तिकडे अमेरिकेत केवळ 75 वर्षातच त्याच अमेरिकेचे दोन तुकडे झाले. त्याचे कारण एकच की दक्षिण अमेरिकेला काळ्यांची गुलामी शेतात राबविण्यासाठी आवश्यक होती. तर उत्तर अमेरिकेला लोकशाही मूल्ये आवश्यक वाटत होती. याच विचारांचा उद्रेक केवळ आणि केवळ 75 वर्षातच लोकशाही विरुद्ध सरंजामशाहीमध्ये झाला. ज्या तेरा वसाहतीने एकत्र येऊन इंग्रजांच्या जोखडातून अमेरिकेला मुक्त केले होते. तीच अमेरिका आज या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी उत्तर अमेरिका तर याच मूल्यांच्या विरोधात दक्षिण अमेरिका उभी टाकली.
यांच्यात घणघोर युद्ध झाले. 6 वर्षांच्या युद्धानंतर उत्तर अमेरिकेच्या अध्यक्षपदी असलेल्या महामानव अब्राहम लिंकन यांनी लोकशाही धोक्यात आहे, “तीचे रक्षण करणे आमचे अंतिम ध्येय आहे. ” अशी गर्जना करुन लोकशाहीचे संरक्षण केले. आणि पुन्हा एकदा अमेरिका एक झाली……!!!
इकडे आमच्या भारतात सुद्धा स्वातंत्र्यानंतरच्या, संविधान दिनाच्या, संविधान अंमलबजावणी दिनाच्या 75 वर्षातच दक्षिण अमेरिकेच्या सरंजामशाही प्रमाणेच मनुवाद्यांनी RSS वाल्यांनी, भाजपने मनुस्मृती लागू करण्यासाठी लोकशाही, संविधान आणि लोकशाही मूल्ये धोक्यात आणण्यासाठी उचल खाल्लेली आहे…….
आजच्या आधुनिक EVM मनुस्मृतीच्या आधारे ( जीला संपूर्ण जगाने अनुभव घेऊन लाथाडले ) लोकशाही मूल्ये धोक्यात आणण्याचे प्रयत्न कोरोनाच्या गतीने चालू केले आहेत……….
अमेरिकेतील दाक्षिणात्यांना काळ्यांच्या गुलामीची गरज सारंजामशाहीसाठी आवशकता होती…….
तर इकडे भारतात भाजप, RSS, मनुवाद्याना अदानी, अंबानी यांच्या माध्यमातून भांडवलशाही निर्माण करुन गरीब श्रीमंतीची दरी निर्माण करुन मनुस्मृती लादण्याचे ध्येय आहे…….
परंतू , स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भारतातील मनुवाद्याचे आणि दक्षिण अमेरिकेचे ध्येय एकच की…….
लोकशाही संपुष्टात आणणे….!!
अमेरिकेला तर 75 वर्षानंतर लोकशाहीला वाचविण्यासाठी महामानव अब्राहम लिंकन लाभले होते………..!
परंतू इकडे भारतात या आमच्या लोकशाहीला, संविधानाला, लोकशाही मूल्यांना वाचविण्यासाठी 2024 च्या काळात कोणते महामानव आहेत…….?
कुणीही नाहीत…………!
आता आपल्यालाच प्रत्येक भारतीय नागरिकाला , आदरणीय अब्राहम लिंकन व्हावे लागेल…….
त्यासाठी या मनू वाद्यांचा, RSS वाल्यांचा, भाजपवाल्यांचा जीव ज्या EVM च्या पोपटात आहे. त्या पोपटाला ठार मारण्याचे काम प्रत्येक भारतीय नागरिकाला Irfan लागेल………
त्यानंतर लोकशाही मूल्ये पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी त्याला अविष्कारीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील……
कारण येथील सर्व व्यवस्था प्रधानमंत्री,, राष्ट्रपती, उच्चं न्यायालये, सर्वोच्च न्यायालय, C. A. G. कॅग, RBI, CBI, पत्रकारिता ( मोदीची गोदी मीडिया ), राज्य सरकारे इत्यादी सर्व व्यवस्था पणाला लावली आहे ती केवळ यासाठीच की या देशातील जनतेचा मताचा अधिकार या EVM ला सेटिंग करुन घेतला की आपल्याला मनुवाद स्थापन करण्यास मोकळे……..!
विरोधकांना पैश्याच्या बळावर फोडून त्यांचे प्रथम पंख छाटले, त्यामुळे ते उडू शकत नाहीत……..!
अशा टोकाच्या अवस्थेत सुद्धा आम्ही संविधाननिष्ठ, देशनिष्ठ, प्रत्येक भारतीय नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेणार का………?
केवळ कोरड्या जाती धर्माच्या डबक्यांचाच आम्ही विचार करणार का…….?
नाही……
नाही……..
कदापि नाही…….
तर आम्ही प्रत्येक भारतीय नागरिक धोक्यात आलेल्या लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी, EVM जगाच्या वेशिवर टांगण्यासाठी, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधूतेच्या न्याय्य हक्कासाठीच……..
आदरणीय अब्राहम लिंकन बनणार…….
आवाहनकर्ता, जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689