शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी राज्यसभेत संविधान विषयाला अनुसरून बोलताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणारे उपोरोक्त वक्तव्य करून देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्यात व त्यांची शांतता भंग केली असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यावर विविध कलमान्वये फौजदारी कारवाई करण्याची मागणी,”चिमूर तालुका आजाद समाज पक्षांच्या, पदाधिकाऱ्यांद्वारे निवेदनातून महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना केली आहे.
याचबरोबर परभणी येथील काॅम्बिंग आप्रेशन घटना गंभीर असून निर्दोष आया-बहिणींना आणि तरुण-तरुणींना,बुजरुग नागरिकांना यातंर्गत अटक करण्यात आली.त्यांचे विनाअट गुन्हे मागे घ्यावे व इतरेत्र खऱ्या आरोपींना अटक करावी अशी मागणी सुध्दा निवेदनातंर्गत करण्यात आली आहे.
तद्वतच चिमूर तालुक्यातील मौजा गदगाव प्रकरणाबाबतही निवेदनात विविध प्रकारच्या मागण्या नमूद करण्यात आलेल्या आहेत.
*****
खालील प्रमाणे निवेदन जैसे थे…
प्रति,
सन्माननिय राष्ट्रपती महोदया..
भारत देश,नवी दिल्ली..
मार्फत :-
मा.अप्पर जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय,चिमूर..
अर्जदार :- तालुका अधक्ष अमित हरिदास भिमटे (आजाद समाज पार्टी, कांशीराम )
विषय :-
खालील मागण्या पूर्ण करण्याबाबत…
1) महाराष्ट्र राज्यातील परभणी येथील आंबेडकरी बौध्द लोकांवर झालेल्या अत्याचाराची व सोमनाथ सुर्यवंशी हत्या संदर्भात चौकशी न्यायालयीन आयोग बसवून दोषी पोलीसांना फाशीची शिक्षा करण्याबाबत.
2) देशाचे गृहमंत्री अमीत शाह यांनी स्वर्ग आणि ईश्वर यांच्या बाबत चुकीचे विधान करून हिंदू धर्माला अपमानित केल्याबाबत.
3) गदगांव (चिमूर) येथील इतर समाजातील जातीयवादी, मनुवादी लोकांनी वाद निर्माण करुन बौध्द समाजाचा पंचशिल ध्वज (झेंडा) व गौतम बुध्दाची मुर्ती, तारेचे कुंपण व कुंपणाच्या आत उसे असलेले टेन्ट हटविण्यासाठी विना परवानगीने मोर्चे काढले व प्रशासनावर दबाव निर्माण केल्याने व प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली सदरचे अतिक्रमण अतिजलद हटविले या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन बौध्द बांधवाना त्यांचा हक्क मिळवून देवून त्यांना संरक्षण देण्याबाबत.
वरील सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याकरीता न्यायालयीन आयोगाची नेमणूक करून संबंधील दोर्षीवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत.
महोदय,
सविनय निवेदन याप्रमाणे आहे की,महाराष्ट्र राज्यातील परभणी येथील आंबेडकरी बौध्द समाजावर झालेल्या अत्याचाराचा निवेदनाद्वारे आम्ही पूर्णपणे निषेध करतो व करण्यात येत आहे.
दि. 10/12/2024 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ काचेच्या पेटीत असलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची तोडफोड केली. काही समाजबांधवांनी त्यांना पकडून पोलीसांच्या स्वाधीन केले.
भारतीय संविधान,राष्ट्रगीत व राष्ट्रध्वज याचा अपमान करीत असेल तर त्यांच्यावर आयपीसी कलम 124 (अ) नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो असे भारतीय संविधानातील अनुच्छेद 5 (क) (क) मध्ये तरतूद आहे.
असे असतांना परभणी पोलीस प्रशासनाने श्री.दत्ता सोपान पवार वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल न करता अॅक्ट्रासिटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला व लगेच त्यांना माथेफिरु म्हणून घोषीत करून सोडून दिले.
दुस-या दिवशी ही बातमी समाजामध्ये पसरताच समाजबांधवांनी पोलीस प्रशासन व महसुल प्रशासन यांना जाब विचारले असता समाधानकारक उत्तर दिले नाहीं.
काही वेळाने काही लोक तौडाला रुमाल बांधून बस व इतर वाहनाची तोडफोड करीत होते.पोलीस प्रशासनाने दोन-तीन तास कुठलीही अॅक्शन घेतली नाही.
तसेच काही पोलीस बौध्द समाजातील गाड्यांची तोडफोड करतांना वायरल झाले.तसेच काही वेळाने पोलीस प्रशासनाने काही दाढीवाले लोकांना गोळा करून जेव्हा की ते पोलीस प्रशासनात नाहीत,त्यांच्यासह अमानुष लाठीचार्ज करण्यात आला.
सायंकाळी कोबींग ऑपरेशन करुन निरपराध लोकांना,महिलांना व तरुण मुला-मुलींना बेदम मारहाण करण्यात आली.
त्यानंतर सायंकाळी सुर्यास्तानंतर महिलांना अटक करता येत नाही असे असतांना संबंधीत पोलीस प्रशासनाने सायंकाळी महिलांना उचलून नेवून पोलीस स्टेशनमध्ये दार बंद करून मारहाण करण्यात आली. काही महिला दवाखान्यात भरती झाल्या.
दोन समाजात तेढ निर्माण केल्याने धर्मवंश,जन्मस्थान भाषा निवास गटागटामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.राष्ट्रीय एकात्मकता बंधनकारक असलेले कृत्य केले आहे.धार्मिक व वांशीक भावना दुखावल्या आहेत.
बौध्द महिलांचा अपमान केलेला आहे.रात्रभर मारहाण करुन अमानुष अत्याचार केलेला आहे. सार्वजनिक आंगळीक निर्माण करुन शांतता भंग केली आहे.त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
देशाविरुध्द व प्रांताविरुध्द असभ्य कृत्य केले आहे.एक एल.एल.बी.मध्ये शिक्षण घेत असलेला मुलगा सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांना अमानुष मारल्यामुळे पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यु झालेला आहे.
तर दुसरा सामाजीक कार्यकर्ता वाकोडे यांच्यावर सुध्दा गुन्हा दाखल केल्यामुळे ते सुध्दा मरण पावले आहेत.
तसेच राष्ट्रीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे.याला सर्वस्वी जबाबदार दत्ता सोपान पवार व अशोक गोरंमान पोलीस इन्स्पेक्टर पोलीस स्टेशन परभणी व अज्ञान दाढीवाले पोलीसांना मदत करणारे व निरपराध लोकांना दांडयानी मारहाण करणारे यांच्यावर तसेच अशोक गोरमान पोलीस इन्स्पेक्टर यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे व दत्ता सोपान पवार यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत केल्यामुळे या आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 124 (अ) व भारतीय न्याय संहितेच्या कलम 152 तसेच अशोक गोरमान पोलीस इन्स्पेक्टर यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 (1), 106 (1), 302, 1 352 भा.दं.वि. कलम 120 (ब), 153 (अ,ब,क) 298, 504, 505 (अ.ब), 505 (1), 505 (2) व अॅक्ट्रासीटी अॅक्ट कलम 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावे.
तसेच पोलीस प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली किंवा संगनमताने घडवून आणलेली दंगल आहे किंवा कोणाच्या आदेशावरुन हे घडले.या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण या सर्व प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची नेमणूक करुन दोषर्षीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी,तसेच एलएलबी मध्ये शिक्षण घेत असलेला मुलगा सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी यांना अमानुष मारल्यामुळे पोलीस कोठडीत त्यांचा मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटूंबीयांना एक कोटी रुपयाची नुकसान भरपाई देण्यात यावी व कुटूंबातील एका व्यक्तीला कायमस्वरुपी नोकरी महाराष्ट्र शासनाने द्यावी अशी मागणी आंबेडकरी बौध्द समाजाकडून करण्यात येत आहे.
2) देशाचे गृहमंत्री अमीत शाह यांनी दिनांक 18/12/2024 रोजी संसद भवनामध्ये महामानव तथा कायदयाचे पंडीत असलेल्या भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना,” ‘आंबेडकर,आंबेडकर, आंबेडकर,आंबेडकर, आंबेडकर,आंबेडकर हे फॅशन झाले आहे,देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता, असे बेताल वक्तव्य करून करोडो हिंदू बांधवाच्या भावना दुखावल्यामुळे तसेच आमच्या काल्पनिक स्वर्ग आणि ईश्वर यांच्या बाबत चुकीचे विधान करून हिंदू धर्माला अपमानित केल्याबाबत आणि भारतीय राज्य घटने नुसार देशात धर्म निरपेक्षता असतांना आम्हा हिंदूंच्या मुळ ढाच्यालाच गलीत गात्र करण्याचा प्रयत्न अमित शाह यांनी केला.
त्यामुळे सर्व जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे समाजामध्ये शत्रुत्व निर्माण केले,असभ्य कृत्य संसदेमध्ये करुन लाईव्ह इलेक्ट्रानिक माध्यमातून प्रसिध्द झाल्यामुळे भारतातील तमाम हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमीत शाह यांनी सर्व जनतेची जाहीर माफी मागावी व आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आजाद समाज पार्टी (कांशीराम) तर्फे निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.
3) मौजा गदगांव येथील मुमापन क्र. 94 व 95 मधील आबादी प्लॉट नं. 28 आराजी 0.07 हे. आर (7956 चौ. फुट) आबादी गावठाणामधील बौध्द समाजाच्या वस्तीमध्ये प्लॉट नं. 28 आराजी 0.07 है. आर (7956 चौ. फुट) खाली जागेवर अनेक वर्षापासून महापुरुषांची जयंती,पुण्यतिथी व इतर कार्यक्रम बौध्द बांधव शांततेमध्ये पार पाडीत होते.
त्यानुसार सदर अतिक्रमीत जागा नियमानुकूल करून मिळण्याकरीता दिनांक 20/10/2023 रोजी मागणी केली होती.
परंतु महसुल प्रशासनाने सदर मागणीसंदर्भात आजतागायत कोणतीही दखल घेतली नाही किंवा न्याय सुध्दा दिला नाही.जाणीवपूर्वक मागणीकडे दुर्लक्ष केले.
गावामधील हनुमान मंदीर,मानकादेवी मंदीर तसेच नदी काठावरील इतर मंदीरे सुध्दा अतिक्रमीत जागेवर आहेत व ते नुकतेच मंदीर तयार झालेले आहेत.
गावात शांततां व सुव्यवस्था असतांना गदगांव येथील काही इतर समाजातील लोकांनी बौध्द समाजाचा पंचशिल ध्वज (झेंडा) व गौतम बुध्दाची मुर्ती,तारेचे कुंपण व कुंपणाच्या आत उभे असलेले टेन्ट हटविण्यासाठी विना परवानगीने मोर्चे काढले व प्रशासनावर दबाव निर्माण केले.
त्यामुळे महसुल प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी कायदयाच्या बाहेर जावून पक्षपात,भेदभाव करुन बाकीचे अतिक्रमण सोडून बौध्दाच्या वस्तीमध्ये असलेले बौध्द समाजाचा पंचशिल ध्वज (झेंडा) व गौतम बुध्दाची मुर्ती,तारेचे कुंपण व कुंपणाच्या आत उभे असलेले टेन्ट दिनांक 03/12/2024 रोजी हटविले व दोन समाजामध्ये भेदभाव निर्माण केले.
त्यामुळे आरोपीवर तात्काळ भारतीय न्याय संहिता 2023 व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 च्या सुधारणा 2016 च्या कलमानुसार सर्व आरोपीवर अट्रासिटीच्या कलमानुसार फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांचेवर कारवाई करण्यात यावी,तसेच सदर प्रकरणात मास्टरमाइंड कोण,कोणाच्या दबावातून सदरचे प्रकरण घडवून आणले याची सविस्तर चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची नेमणूक करून दोर्षीवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
वरील सर्व मागण्याची पुर्तता करण्यासाठी आजाद समाज पार्टी (कांशीराम) तालुका चिमूर यांचे कडून उचित कार्यवाहीकरीता सादर करण्यात येत आहे.
स्थळ :- चिमूर
दिनांक: २७/१२/२०२४
आपले विश्वासू,
अमित हरीदार भिमटे
( तालुका अधक्ष आजाद समाज पार्टी. कांशीराम)
*****
प्रतिलिपी :
1. मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब,भारत सरकार,नवी दिल्ली..
2. मा.सरन्यायाधिश,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली..
3. मा.मुख्य न्यायाधीश,उच्च न्यायालय,मुंबई…
4. मा.मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस साहेब,म.रा. मुंबई…
5. मा.पोलीस महासंचालक, म.रा. मुंबई…
6. मा.पोलीस अधिक्षक, जिल्हा कार्यालय चंद्रपूर..
7. मा.जिल्हाधिकारी, कार्यालय चंद्रपूर…
यांना माहितीस व उचित कार्यवाहीस सविनय सादर…