उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
चिमूर तालुक्यातील भिसी येथील माजी प्राचार्य,त्यांची पत्नी व २५ वर्षे वयाचा मुलगा यांनी त्यांच्या घरामोरील आम रस्त्यावर उभी असलेल्या चारचाकी वाहनाला ८ वर्षिय बालकाने हात लावला म्हणुन दिडशे फुट अंतरावरून ओढत नेऊन आपल्या घरच्या दुसऱ्या माळ्यावर व तळ मजल्यावरिल छावणी मध्ये अमानुष पणे लाथा – बुक्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवारला सकाळी अंदाजे १० वाजताचे सुमारास घडली.
पोलीस स्टेशन भिसी येथे पिढीत बालकाच्या आईने दिलेल्या तक्रारी वरून बालकाला प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.
डाॅक्टरांच्या वैद्यकीय अहवाला नंतरही सामुहिक पणे बालकाला अमानुष मारहाण करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करता पिढीत बालकाच्या तक्रारकर्त्या आईला एन.सी.चा कागद दिलेला आहे.
त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी यासंबधी सखोल चौकशी करून बालकाला अमानुष मारहाण करणाऱ्यांची फेर चौकशी करून बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी भिसी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतुन पिढीत बालकाच्या आई – वडीलांनी गुरूवारला केलेली आहे.
पत्रकार परिषदेला पिढीत बालक मंथन शंकर रामटेके वय ८ वर्षे,आई सुर्यकांता रामटेके,वडील शंकर रामटेके,माजी सरपंच विश्रांती रामटेके,सेवक रामटेके,विलास रामटेके,कवडू वासनिक उपस्थित होते.
प्राप्त माहीती नुसार बुधवारला सकाळी अंदाजे २० वाजताचे सुमारास भिसी येथे मंथन शंकर रामटेके वय ८ वर्षे हा बालक आपल्या घराकडे जात असतांना माजी प्राचार्य सुधाकर गोहणे,पत्नी कांचन गोहणे,मुलगा मयुर सुधाकर गोहणे वय २५ वर्षे राहणार भिसी यांनी त्याच्या घरामोरील आम रोडवर उभी असलेल्या चारचाकी वाहणाला बालकाने हात लावला म्हणुन दिडशे फुट अंतरावरून ओढत नेऊन आपल्या घरी दुसऱ्या माळ्यावर व तळ मजल्यावरिल छावणी मध्ये अमानुष पणे लाथा – बुक्यांनी मारहाण केली.
त्यानंतर पिढीत बालकाची आई सुर्यकांता शंकर रामटेके यांनी पोलीस स्टेशन भिसी येथे दिलेल्या तक्रारी वरून बालकाला प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथे दाखल करण्यात आले.
डाॅक्टरांनी वैद्यकीय अहवाल दिला.त्यानंतर पोलीसांनी पिढीत बालकाच्या आईला एन.सी.पत्र देऊन न्यायालयात जावुन दाद मागावी अशी सुचना केली.
८ वर्षिय बालकाचा काहिही गुन्हा नसतांनाही अमानुष पणे लाथा- बुक्यांनी मारहाण केली त्यांना मोकडे सोडलेले आहे.
तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यासंबधी फेर सखोल चौकशी करून बालकाला अमानुष्यपणे मारहाण करणाऱ्यांवर बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करून अटक करण्याची मागणी पत्रकार परिषदेतुन पिढीत बालकाच्या आई – वडीलांनी केलेली आहे.