ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : नुकत्याच सुरू झालेल्या “प्रधानमंत्री बिमा सखी” योजनेत महिलांना वेतन आणि कमीशन एकाच वेळेस मिळणार असून ग्रामीण भागातील महिलांनी आता भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या केंद्रीय योजनेचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर होऊन आर्थिक प्रगती करा असे ( शुक्र. २७ डिसें.ला.) कुंभली धर्मापूरी येथे बीमा सखी भरती शिबीरात महिला प्रतिनिधी पुजा कुरंजेकर यांनी प्रतिपादन केले.
महिलांसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मागील चार महिन्यात अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केली. त्यामध्ये महिलांना १५००/- रुपये प्रतिमाह देण्यात आले. त्या योजनेतील महिलांचा सहभाग पाहता केंद्र सरकारने महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भय बनविण्याकरिता रोजगार देण्याच्या उद्देशाने भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या माध्यमातून प्रधानमंत्री बिमा सखी योजनेची सुरूवात ९ डिसेंबर २०२४ ला स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाली आहे. या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात ५०००० महिलांचा सहभाग होता.
कुंभली धर्मापूरी येथे बीमा सखी भरती शिबीरात सांगितले की, देशातील सुशिक्षित महिलांना या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील महिला या योजनेत सहभागी होण्यासाठी आतुरत झाल्या आहेत. ही योजना महिलांसाठी अतिशय फायदेशीर असल्यामुळे महिलांचा या योजनेत जास्तीत जास्त सहभाग दिसून येत आहे.
विशेष करून या योजनेत काम करण्यासाठी सुशिक्षित महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता त्यांना रोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यासाठी व विमा क्षेत्रात महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून रोजगार देण्यासाठी साकोली शाखेतील ( सी एल आय ए ) पुजा नरेश कुरंजेकर यांनी ग्रामीण भागात प्रत्येक गावात शिबिर आयोजित करण्यास सुरुवात केली आहे.
सुशिक्षित बेरोजगार महिलांना रोजगार देण्याच्या उद्देशाने घेन्यात आलेल्या शिबिरात महिलांकडून योग्य प्रतिसाद मिळत आहे. महिला बिमा सखी योजना कशी आहे, या योजनेत किती विमा करायचे आहेत व कोणत्या महिन्यात किती विमा करायचे आहे.
तसेच या योजनेची फायदे काय आहे व या योजनेमार्फत कशा प्रकारे काम केले जाईल याची सविस्तर माहिती या शिबिराच्या माध्यमातून सुशिक्षित महिलांना साकोली शाखेतील ( सी एल आय ए ) पुजा नरेश कुरंजेकर यांनी सांगितले. यावेळी जनतेनी उत्सुकता दाखवून या योजनेची माहिती घेतली.