
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
ठाणेदार पोलिस स्टेशन वरोरा,उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा,जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांच्याकडे,केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यासंबधाने तक्रार दाखल केली असता त्यांनी वेळेत गुन्हे दाखल केले नाही.
यामुळे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय वरोरा येथे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यासह चंद्रपूर जिल्हाधिकारी विनय गौडा,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन,वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ साटम,वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे यांच्याविरुद्ध फौजदारी पिटिशन २६ डिसेंबर २०२४ ला दाखल केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी राज्यसभेत बोलताना संविधान निर्माता,जगमान्य थोर समाजसुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून त्यांचा अपमान करणारे उपोरोक्त वक्तव्य केले होते.
यामुळे देशातील शांतता भंग झाली व देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्यात.याचबरोबर समाजासमाजात तेढ कायम रहावे यासाठी अमीत शहा यांचे उपोरोक्त वाक्य कारणीभूत ठरणारे आहे आणि जातीवादाची-अंध्दश्रध्देंची बिजे सखोल रुजविण्यासाठी सुध्दा पुरेसे आहे.
म्हणूनच केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत संविधान अभ्यासक विनोदकुमार खोब्रागडे यांचे आहे.
त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत येणाऱ्या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांकडे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारी दाखल केल्या होत्या.त्यांच्या तक्रारींची संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच विनोद खोब्रागडे यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी वरोरा येथे या सर्वांच्या विरोधात फौजदारी पिटिशन दाखल केली आहे.