रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी..
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक शब्द बोलले असता त्यांचा निषेध करत तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाजाने तहसील कार्यालयावर गुरुवारला दुपारी जन आक्रोश मोर्चा काढन्यात आला.
दरम्यान अमीत शाहचा प्रतीकृती बॅनवर असलेल्या फोटो ला चप्पला मारत बॅनर जाळले.या मोर्चाचे नेतृत्व संघरामगीरी येथील महाथेरो भदंत ज्ञानज्योती व भिक्षू संघ यांनी केले.
जनआक्रोश मोर्चाला शहरातील तक्षशिला बौद्ध विहार आझाद वार्ड येथून सुरुवात करण्यात आली.
मोर्चा तहसील कार्यालय परिसरात पोहचल्यावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी संसदेत केलेल्या अपमानजनक शब्दाविषयीचा निषेध मोर्चातील आंबेडकरी समाजाने केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंबेडकरी जनतेची माफी मागावी व परभणी येथील आंबेडकरी बौद्ध समाजावर झालेल्या अत्याचाराचा निषेध, सोमनाथ सुर्यवंशी हत्या संदर्भात दोषी पोलीसांवर फाशीची शिक्षा, गदगांव ( चिमूर ) येथे बौद्ध समाजाचा फक्त झेडा निर्माण केला असता काही जातीवादी लोकांनी वाद निर्माण केला तरी बौद्ध समाजाला संरक्षण देण्याविषयी व परभणी येथील आंबेडकरी बौद्ध समाजला दडपून टाकण्याचा प्रकार भाजप सरकार करीत आहे असे निवेदनात म्हटले आहे.
या मोर्चाचे निवेदन अप्पर जिल्हाधीकारी किशोर घाडगे मार्फत राष्ट्रपती यांना संघरामगीरीचे महाथेरो भंदत ज्ञानज्योती,भिख्खू संघ,आणि सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
मोर्चाचे आयोजन किशोर अंबादे,विलास शंकरकर,उद्धव डेकाटे,नेपचंद बारसागडे,रोशन ढोक,सिद्धार्थ चहांदे,अमोल शंभरकर,गौतम पाटील,शुभम मंडपे,जगदीश मेश्राम आणि इतर समाज बांधवांनी केले होते.मोर्चाला तालुक्यातील हजारो महिला पुरुष उपस्थित होते.
मोर्चा निवेदनाच्या प्रतीलीपी भारत सरकार पंतप्रधान,सर्वोच्छ न्यायालय सरन्यायाधीश,उच्च न्यायालय मुंबई मुख्य न्यायाधीश,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबई पोलीस महासंचालक,चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना पाठविण्यात आल्या.