ब्रेकिंग न्यूज… — वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी…  — विरखल (चक) येथील घटना… 

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

         सावली तालुक्यातील व्याहड ( खुर्द ) उपवनपरिक्षेत्रातील नवेगाव वनबीटात येणाऱ्या दाबगाव येथील गुराखी नामे खुशाल ऋषीजी दुधे वय ३९ वर्ष हा गुराखी आज विरखल ( चक ) जंगल परिसरात नेहमीप्रमाणे गुरे चरायला नेला असता ३ वाजताच्या दरम्यान झुडपा मध्ये दबा धरून असलेल्या वाघाने गावाला लागुन असलेल्या पटाचे जागेत त्याच्यावर हल्ला केला.

          त्यात तो गुराखी गंभीर जखमी झाला असून त्याच्या ओरडन्याने गावशेजारील नागरिक जंगलाच्या दिशेने धाव घेत घटना स्थळावर पोहोचले आणि या घटनेची माहिती क्षेत्र सहाय्यक सूर्यवंशी यांना मिळतात ते आपल्या सहकार्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत असलेल्या गुरख्यास प्राथमिक आरोग्य केंद्र अंतरंगाव येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालय गडचिरोली येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

           विरखल ( चक ) हे गावं पाथरी जंगल परिसराला लागुन असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात हिंस्त्र प्राणि आहेत. सदर घटना घडल्या ने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

कोट 

            मौजा विरखल येथे नेहमी वाघ बिबट्याचा संचार असतो. येथे जंगलाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असल्याने जंगली प्राणी कोकलापार तलावात येत असतात त्यामुळे नागरिकांना हा त्रास होत आहे. 

ईश्वर गंडाटे सामाजिक कार्यकर्ते विरखल