ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभाग वतीने जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात २३, २४ व २५ डिसेंबर तीन दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा सांस्कृतिक कार्यक्रमांनी शानदार समारोप झाला. यात जिल्हा परिषद शाळांवर बक्षीसांची लयलूट करण्यात आली.
या तीन दिवस महोत्सवात जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र. १, २ केंद्र अंतर्गत अनेक शाळांनी सहभाग नोंदविला. यात कबड्डी खोखो सामने, सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकीका, समुहगीत, समुह नृत्य, नकला, देशभक्ती गीत झालीत.
याचा बुध. ता. २५ ला बक्षीस वितरण समारंभात अतिथी पं. स. गटशिक्षणाधिकारी विजय आदमने, केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, मुख्याध्यापक डि. डि. वलथरे, हेमंत भारद्वाज, आशिष चेडगे, वैशाली कापगते, योगराज मुंगमोडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात उत्तम प्रस्तुती दिली. तर अखेरच्या दिवशी सांस्कृतिक महोत्सव बघण्यासाठी पंचशील वार्ड, शिवाजी वार्डातील महिला पुरुष जनतेनी जिल्हा परिषद हायस्कूल प्रांगणात तुफान गर्दी केली होती.
सदर तीन दिवसीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी विविध शाळांतील शिक्षकवृंद प्रमेश मररकोल्हे, सुरेश धकाते, उषा खेडीकर, एस. आर. वैद्य, एस.ए. हर्षे, एस.एस. खंडाईत, एम. व्ही. बोकडे, यु.जी. भस्मे, चेतन बोरकर, चित्ररेखा इंगळे, श्रद्धा औटी, पी. के. पाटील, सी.एम. समरीत, शालिनी राऊत, एम. ए. वंजारी, जे. जे. पडोळे, डी.एन. वैरागडे, एम.ए. शहारे, आर.एस. झलके, एस.सि. मांदाडे, पी. व्ही. पारटकर, आर.एस. पटले, डी. बी. हेमणे, पी.टी. तुळशिकर, एस.एन. सयाम आणि सर्व प्राथमिक, कनिष्ठ, वरीष्ठ शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
यात संचालन व्यवस्था टि. आय. पटले व सुरेश हर्षे यांनी सांभाळली तर भोजन व्यवस्था शालेय व्यवस्थापन समिती व पोषण आहारचे मदतनीस यांनी पाहिली.