दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष व अलंकापुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे यांनी तयार केलेल्या दिनदर्शिका २०२५ चे प्रकाशन सफला एकादशीच्या मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त योगी निरंजननाथजी,पालखी सोहळा मालक हभप बाळासाहेब आरफळकर व डॉ.राम गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ.राम गावडे यांनी दिनदर्शिकेचे अवलोकन केल्यानंतर समाधान व्यक्त केले. दिनदर्शिकेमध्ये मराठीत सण-उत्सव, यात्रा उत्सव याची माहिती जनतेला महत्त्वाचे ठरेल, त्याचबरोबर घरोघरी दिनदर्शिका गेल्याने किरण येळवंडे यांच्या सामाजिक कार्याचा प्रचार-प्रसार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी ज्ञानेश्वर वीर,शांताराम भोसले,डॉ.राम गावडे,संजय घुंडरे,रामभाऊ भोसले,पांडुरंग वहीले,सचिन गिलबिले,संतोष गावडे,दिनेश घुले,सागर भोसले,गणेश राहणे,शिरीषकुमार कारेकर,शामराव गिलबिले,गणेश गरुड,आकाश जोशी,बंडुनाना काळे,प्रितम किर्वे,वासुदेव तुर्की,संकेत वाघमारे,ज्ञानेश्वर बनसोडे,मंगलताई हुंडारे,हभप संदीप महाराज लोहर,हभप संतोषानंद शास्री आदींसह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.