उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
परभणी प्रकरणाला अनुसरून आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी दिनांक १७ डिसेंबरला राज्यसभेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काढलेले उपोरोक्त आणि अनुसूचित वाक्य हे अपमान करणारे होते.याचबरोबर देशाच्या इज्जतीवर वार करणारे होते.त्यांचे उपोरोक्त आणि अनुचित वाक्याला अनुसरून त्यांचा निषेध करण्यासाठी आज तक्षशीला बुद्ध विहार पासून चिमूर तहसील कार्यालयावर बहुजन महिला व बांधवांनतर्फे मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व जगप्रसिद्ध महाथेरो भदंत ज्ञानज्योती यांनी केले.या मोर्चात संघारामगिरी येथील भिक्षु संघ सहभागी झाला होता.
परभणी येथील आंबेडकरी बौद्ध लोकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करतानाच न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी हत्या संदर्भात दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुध्दा करण्यात आली.
देशाचे गृहमंत्री अमीत शाह यांनी डॉ.बाबासाहेब आंबडेकरांवर केलेल्या अपमानस्पद व्यक्तव्य केल्याबद्दल त्यांनी पदाचा राजीनामा द्यावे व आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
याचबरोबर चिमूर तालुक्यातील मौजा गदगाव येथे बौध्द समाज बांधवांनी धम्म ध्वजासह झेंडा गाढला म्हणून वाद निर्माण करण्यात आला होता.यासंबंधाने काही जातीवादी तथा मनूवादी लोकानी वाद निर्माण केला असल्याने बौध्द समाजाला संरक्षण देण्याची मागणी सुध्दा मोर्चातील नागरिकांद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्रतील परभणी शहरामध्ये १० मार्च रोजी सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला,तो बांगला देशातील हिंदूवरील अन्याया विरोधात.त्यानंतर एका पवार नावाच्या व्यक्तीनी ‘संविधान शिल्प’ तोडले हा देशद्रोह आहे.या विरोधात तमाम संविधान प्रेमी व आंबेडकरी जनतेने त्याच्या विरोध करायचा म्हणून मोर्चा काढला होता.
त्या मोच्यामध्ये सर्व स्तरातील लोक होते.परंतु त्यात काही तोंडाला फडके बांधलेले लोकही होते.या मोर्चा नंतर तोडफोड झाली,काही आक्रोश झाला.
मात्र पोलीसांनी तोंडाला फडके बांधलेल्या दंगलखोरांना पकडले नाही.पण आंबेडकरी तरुणांना,स्त्रियांना मात्र बेदम मारहाण करीत,फरफरत नेवून अंगावर उभे राहुन,स्त्रियांना तुडवून तुडवून बेशुद्ध केले आणि त्याच लोकांवर १५ प्रकारचे गुन्हे दाखल केले.ज्या मध्ये बेल होत नाही.
त्यांना कोठडीत डांबून ठेवले आणि इतकी अमानुष मारहाण केली की त्यात सोमनाथ सुर्यवंशी नावाचा तरुण (एल.एल. बी.करणारा) विद्यार्थी जागीच मरण पावला.
या धक्याने दलित पँथरचे परभणीचे नेते विजय वाकोडे यांना हॉर्टअॅटक आला आणि त्यांचाही मृत्यू झाला.
पोलीस इतक्या क्रूरपणे घरात घुसून घुसून लोकांना ओढून काढत होते व घराची प्रचंड हाल करून लोकांना तुडवित होते हे दृष्य वत्सलाबाई मानवटकर यांनी मोबाईल मध्ये घेतले म्हणून त्यांना तुडवून मारले.
अशा प्रकारे जणू काही पेशवाईच आली असे भय परभणीत सुरु केले.हा आंबेडकरी बौद्ध समाजाला दडपून टाकण्याचा प्रकार आजचे बीजेपी सरकार करीत आहे.
आंबेडकरी लोकांमध्ये दंगे घडवून त्यांना त्यात गुंतवून ठेवून त्यांच्या मुळ प्रश्नांकडे लक्ष देऊ न देणे हा हेतू आहे.म्हणून या दडपशाही आणि कुरते विरुद्ध आज चिमूर येथील मोर्चेकऱ्यांनी आवाज बुलंद केला.
आपली ओळख लढवय्ये अशी आहे.ती कायम ठेवू आणि यांना शरण जाणार नाही हेही मोर्चेकऱ्यांनी सांगिंतले.
मोर्चाचे आयोजन किशोर अंबादे-चिमूर,विलास शंभरकर जांभूळविहिरा,उद्धवराव डेकाटे-शिवनपायली,नेपचंद बारसागडे-पिपर्डा,रोशन ढोक-शंकरपूर,सिद्धार्थ चहांदे-भिसी,अमोल शंभरकर-गदगांव,गौतम पाटील-गुजगव्हाण आणि सर्व आंबेडकरी समाजातर्फे करण्यात आले होते.
सदर मोर्चाला चिमूर तालुक्यातील महिला भगिनींनी आणि बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला.