रामदास ठूसे
विशेष विभागीय प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसन सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी चिमूर तालुका कृषी विभाग चिमूर यांच्या वतीने २७ डिसेंबरला सकाळी १० वाजता येथील जुना पोलीस स्टेशनजवळ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा चिमूर तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी. ए. तिखे यांनी केले आहे.
मागील ५ वर्षांपासून देशभरात शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू झाली असून या योजनेचा लाभ देशातील लाखो शेतकऱ्यांना मिळत आहे.
मात्र या योजनेचा लाभ वनपट्टा धारक शेतकऱ्यांना सुद्धा मिळावा, यासाठी चिमूर तालुका कृषी विभागाकडून सदर शेतकऱ्यांच्या नोदणी साठी शिबिराचे आयोजन केले आहे.