सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
विमलताई महिला महाविद्यालय सावली येथे NAAC (नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउंसिल) च्या पीअर टीमची नुकतीच भेट झाली. या भेटीत महाविद्यालयाचा सर्वांगीण आढावा घेतला गेला. या टीमचे अध्यक्ष प्रा. मनोज कुमार सिंह, सदस्य समन्वयक प्रा. शिवानी श्रीवास्तव आणि सदस्य प्रा. हेमला अग्रवाल होते.
पीअर टीमने महाविद्यालयातील शैक्षणिक, प्रशासकीय आणि इतर विविध गोष्टींची बारकाईने तपासणी करून महाविद्यालयाला B++ असे मानांकन दिले.
या यशासाठी महाविद्यालयाचे अध्यक्षा सौ.लता अशोककुमार घरडे मॅडम सचिव अशोक कुमार घरडे,दिपक फुलझेले, प्राचार्य इम्रान खान पठाण तसेच प्राध्यापक आफरोजा पठाण, प्रवीण सहारे, अजिजुल खान, अंजू विघाणे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेतले.
NAAC च्या मानांकनामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तेची पावती मिळाली असून, या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाविद्यालयाने यापुढेही शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्याचा संकल्प केला आहे.