जिल्हा पेन्शनर्सचे साकोलीत २२ वे अधिवेशन संपन्न…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्युज भारत 

साकोली : भंडारा जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन शाखा साकोली चे २२ वे वार्षिक अधिवेशन पेन्शनर्स भवन, कृषी कार्यालय मागे, सिव्हिल वार्ड साकोली येथे ( बुध. २५ डिसें.) ला संपन्न झाले. यात विविध ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कार आणि चर्चा सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. 

         या एकदिवसीय अधिवेशनात प्रमुख अतिथी उदघाटक सभापती गणेश आदे, भंडारा जिल्हा अध्यक्ष ई. ल. ढेंगे, जि. प. सभापती मदन रामटेके, राधेश्याम खोब्रागडे, अजय नंदागवळी, प्रदीप हरडे, विजय आदमने, डॉ. अशोक कापगते, विजया गुप्ता, यशवंत गहाणे, तुळशीराम भुरे, आर. बी. तिडके, तुमसरचे ए. पी. पटले, मोहाडीचे एस. के. देशमुख, एन. ए. निखाडे आदी मंचावर उपस्थित होते. अधिवेशनात अहवाल वाचन तालुका सचिव रामलाल डोंगरवार यांनी केले. तर प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विठ्ठल गि-हेपुंजे यांनी सुरूवात केली.

          याप्रसंगी दिवंगत सभासदांना श्रद्धांजली, देणगीदारांचा सत्कार, अहवाल वाचन, खुली चर्चा असे अनेक विषयांकीत लक्षवेधी सूचना मांडली होती. या कार्यक्रमात राधेश्याम खोब्रागडे, विठ्ठल गि-हेपुंजे, सिंधू खोब्रागडे, किशोर गोस्वामी, पुरूषोत्तम बोकडे, जगन्नाथ कोरे, प्रमिला सार्वे, नामदेव शेंडे, रामकृष्ण परशुरामकर, शोभा डोंगरे, शिला बोरकर, पुरूषोत्तम येरणे, दूधराम आगाशे, सुनिता कुंभरे, विश्वनाथ चांदेवार, व देवानंद अंबादे यांचा अतिथींतर्फै गौरव चिन्ह देत सत्कार करण्यात आला.

          अधिवेशनात तालुका उपाध्यक्ष भाऊराव फुलबांधे, कोषाध्यक्ष ए. ए. पठाण, विठ्ठल मसराम, राजू रोकडे, सुशिल शामकुंवर, डी. बी. येरणे, लिला टेंभरे आणि भंडारा, साकोली, लाखनी, लाखांदूर, पवनी, मोहाडी, तुमसर येथील पदाधिकाऱ्यांनी हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन मार्गदर्शक आर. एम. रामटेके यांनी केले.