मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी.:-जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती प्रिती म.हिरळकर यांचे आवाहन…

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली, दि. २५:- कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळातर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल हे आँनलाइन माध्यम विकसित केले आहे. या पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करण्याचे आवाहन गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्रीमती. प्रिती म. हिरळकर यांनी केले आहे.

        मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे. राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबविणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणुन केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. या मधुमक्षिकापालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी संकेतस्थळ पाहावे.

        हे संकेतस्थळ madhukranti.in/nbb आहे. नोंदणी शुक्क फक्त ऑनलाइन पध्दतीने देता येत असुन, अधिक माहितीसाठी संपर्क जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी, कार्यालयात शेतक-यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

नोंदणासाठी आवश्यक कागदपत्रेः-

           मधुक्रांती पोर्टलवरील नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड (नाव, जन्मतारीख पत्यासह) अद्ययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला) मधुमक्षिका पालनासंबंधित प्रशिक्षण प्रमाणपत्राची सार्ट प्रत (आकार-२०० केबी पर्यत) मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-१०० केबी पर्यंत) आदींचा समावेश आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली श्रीमती प्रिती हिरळकर यांनी कळविले आहे.