सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल निमगाव येथे दिनांक २१/१२/२०२४ ते २३/१२/२०२३ दरम्यान ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.सदर विज्ञान प्रदर्शनीमध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनीमध्ये एकूण माध्यमिक विभागात एकूण १७ शाळांच्या प्रतिकृती सहभागी होते तर प्राथमिक विभागात एकूण ४३ प्रतिकृती सहभागी होते.त्यात माध्यमिक विभागात इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर विश्वशांती विद्यालयाने द्वितीय क्रमांक (कु.अनुष्का येलट्टीवार) पटकाविला.
तसेच आयोजित प्रदर्शनी मध्ये शिक्षकांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात विश्वशांती विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक धनंजय गुरनुले यांनी प्रथम क्रमांक पटकावला, विद्यार्थ्यांसाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये विश्वशांती विद्यालयाची कुमारी प्राजक्ता बावणे हिने तृतीय क्रमांक पटकाविला तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विश्वशांती विद्यालयाची कुमारी प्राजक्ता बावणे हिने प्रथम क्रमांक पटकावला.
विश्वशांती विद्यालयाने विज्ञान प्रदर्शनात विविध चार स्पर्धेमध्ये क्रमांक पटकाविल्याने पंचायत समिती सावलीचे संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक,गटशिक्षणाधिकारी मोरेश्वर बोंडे ,केंद्र प्रमुख जगन्नाथ वाढई, विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार,पर्यवेक्षक मधुकर जाधव यांनी विद्यालयातील सहभागी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.