शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
जागतिक कृषी दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी २४ तास वीजपुरवठा करण्याची मागणी उप कार्यकारी अभियंता भद्रावती यांच्याकडे अन्नदाता एकता मंचाच्या माध्यमातून करण्यात आली.
वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या गावांना वेकोली ढिगाऱ्यामुळे दरवर्षी पूर येत असल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत असतात त्यामुळे पिपरी (देश), तेलवासा, ढोरवासा,कोची,घोनाड या भागात रब्बी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणत करण्यात येत असतात तसेच नदीच्या लागत शेती असल्यामुळे मोठ्या प्रमाणत सिंचनाच्या सुविधा उपलब्ध आहे.
त्यामुळे दिवसा कमी दाबाचा वीजपुरवठा होत असतात तसेच वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे शेती पिकांना पाणी देण्यासाठी उशीर होत असल्यामुळे पिकांवर परिणाम दिसून येत असून उत्पादनात घट होण्याशी शक्यता आले.
त्यामुळे आधीच पुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बी पिकांकडून आर्थिक लाभ होण्याची शाश्वती वाटत आहे त्यामुळे कृषी पंपांना २४ तास वीजपुरवठा करण्याची मागणी डॉ.चेतन खुटेमाटे यांच्या मार्गदर्शनात संदिप खुटेमाटे,मोहन दर्वे, रजत आसुटकर,अनुप खुटेमाटे,दुर्वास उपरे,अविनाश चौधरी,कैलाश कुटेमाटे,मारोती नांदे धनराज बोबडे व असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.