संविधान बचाव संघर्ष समिती आरमोरीच्या वतीने आरमोरी तहसिल कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा…

ऋषी सहारे 

  संपादक

आरमोरी :- सर्व संविधानप्रेमी व संविधान आणि लोकशाहीवादी नागरिकांनी भारताची सर्वोच संसद म्हणजेच राज्यसभेत चर्चेदरम्यान देशातील संवैधानिक पदावर विराजमान असलेले अमित शहा गृहमंत्री, केंद्र सरकार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून केवळ बाबासाहेब आंबेडकरांचाच नाही तर एकप्रकारे संविधानाचा अपमान केलेला आहे, त्यामुळे अशा मनुवादी मानसिकतेच्या व्यक्तीने केंद्रातील गृहमंत्री पदावर राहता कामा नये..

      तसेच परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली, त्याचा निषेध करणाऱ्याः कार्यकर्त्यांवर पोलीसांनी दडपशाही करुन लाठीहल्ला केला व सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत मृत्यु झाला. परंतु सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटूंबाला शासनाने कोणतीही मदत केलेली नाही.

         या मागण्यांसाठी आणि राज्य व केंद्र सरकारच्या जनविरोधी तसेच संविधानविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केलेले आहे.

       संविधानप्रेमी व लोकशाहीवादी नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

प्रमुख मागण्या :-

१) अमित शहा, केंद्रीय गृहमत्री, भारत सरकार यांनी देशातील जनतेची माफी मागून आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.

२) सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्युची न्यायिक चौकशी करुन दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी तसेच त्याच्या

कुटूंबाला रु. १,००,००,०००/- एक कोटी नुकसान भरपाई देण्यात यावी. व कुटूंबातील व्यक्तीस शासकिय नौकरी देण्यात यावी.

सामाजीक संघटनाः प्रियदर्शी सम्राट अशोक सोशल फोरम आरमोरी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मंडळ आरमोरी, आरमोरी मुस्लिम समाज जामा मस्जिद कमेटी, समता युवा सामाजिक संघटना, ढिवर भोई समाज संघटना आरमोरी, माळी समाज संघटना आरमोरी, संत रविदास चर्मकार समाज आरमोरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा मंच, जेतवन बौध्द समाज विकास समिती, अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन, महात्मा फुले युवा संघर्ष समिती आरमोरी, आनंद बुध्द विहार समिती, सिध्दार्थ नगर बौध्द समाज विकास मंडळ, लोकहित संघर्ष समिती आरमोरी, बौध्द समाज जूनी पेठ आरमोरी, बौध्द समाज मोठा मोहल्ला वैरागड, बौध्द समाज इंदिरा नगर डोंगरी व समस्त परिवर्तनवादी सामाजीक संघटना आरमोरी

विविध राजकिय पक्ष :- शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), आझाद समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, तालुका कॉग्रेस कमेटी आरमोरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, लोक जन शक्ती पार्टी (रामविलास) तथा समस्त लोकशाहीवादी व संविधान समर्थक पक्ष नागरिक.

निषेध मोर्चा गुरुवार, दि. २६ डिसेंबर २०२४ दुपारी १२.३० वाजता

स्थळ :- तथागत बुध्द विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून निघणार आहे तरी बहु संख्येने उपस्थित राहून आपला आक्रोश व्यक्त करावा असे आयोजकांनी कळविले आहे.