आ.बापूसाहेब पठारे व आ.बाबाजी काळे यांचा आळंदीत सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरीत्र समिती यांच्या माध्यमातून ओळख श्री ज्ञानेश्वरी हा आध्यात्मिक शालेय उपक्रम गेली तीन वर्षापासून विविध शाळात हा संस्कारक्षम उपक्रम सुरु आहे या उपक्रमात बहुमुल्य सहभाग असणारे बापुसाहेब पठारे यांची वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून व बाबाजी काळे यांची खेड आळंदी विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून विजयी झाल्याबद्दल त्यांना ओळख श्री ज्ञानेश्वरीचे या घटकांच्या वतीने मानपत्र देऊन शंकर महाराज शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली गौरविण्यात आले.

        यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, बबनराव कुऱ्हाडे, समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, सुर्यकांत चौधरी, प्राजक्ता हरफळे, नंदकुमार वडगावकर, संतोषानंद शास्री, विलास वाघमारे, विलास कुऱ्हाडे, संजय वडगावकर, उत्तम गोगावले, ॲड.विष्णू तापकीर, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, आनंदराव मुंगसे, अरुण कुऱ्हे, अर्जुन मेदनकर, बापु गोरे, मंगेश काळे, गोविंदराव तौर, ज्ञानेश्वर माऊली घुंडरे, सतीष कुऱ्हाडे, शशिराजे जाधव, धनंजय काळे, कैलास आहेर, मनोज पवार, मंगेश तिताडे, अनिता झुजम, संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

        यावेळी सत्काराला उत्तर देताना आ.काळे आ.पठारे यांनी सांगितले की संत साहित्याचा अभ्यास हा शाळेत असावा यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे सांगितले. तसेच इंद्रायणी सेवा फौंडेशनचे पुरुषोत्तम महाराज हिंगणकर यांनी आ.बाबाजीशेठ काळे यांनी इंद्रायणी नदी प्रदुषणावर जातीने लक्ष घालावे अशी मागणी केली.