या विश्वात आणि अंतराळात ज्या कांही घडामोडी घडत आलेल्या आहेत,घडत आहेत आणि घडणाऱ्या आहेत.त्या घडामोडीकडे आपण प्रत्येकांनी आपल्या डोळ्याला दिसल्या पाहिजेत,आपल्या नाकाने सुगंधी / दुर्गंधी समजली पाहिजे,जिभेने चव कळली पाहिजे,कानाने ऐकता आले पाहिजे,हाताने स्पर्श केला तर त्याची जाणीव झाली पाहिजे. त्यासोबतच या पाच इंद्रियांच्या मदतीने आपल्या डोक्यातील मेंदूच्या मागच्या भागाचा संपर्क हा आपल्या छातीच्या पिंजऱ्यातील एका हाताच्या मुठीएवढ्या “हृदयाशी ” आपण करुनच जी सदसदविवेक बुद्धी जागृत होते.त्या सदसदविवेक बुद्धीलाच खरी श्रद्धा म्हणतात!
आणि वरील सर्व माध्यमांच्या व्यतिरिक्त आंधळ्याप्रमाणे जेंव्हा आपण विश्वास ठेवतो.त्याला अंधश्रद्धा असे म्हणतात.
प्रथम माझे कर्तव्य हे आहे की, शमी माझ्या सदसदविवेक बुद्धीला जागृत करूनच खरा श्रद्धावान होऊन डोळसपणे मी स्वतःला ओळखूनच माझे नैतिक हक्क आणि कर्तव्य काय आहेत याची जाणीव व्हायला सुरुवात होते.किंबहुना मी माणूस असल्याची तरी निदान जाणीव होते.
हा जो माणूस म्हणून डोळस बनण्यासाठी स्वतःला ओळखण्याचा जो प्रथम मार्ग आहे.हा मार्ग तथागत भगवान बुद्धानी धम्माच्या आपल्या कर्मवादाच्या सिद्धांतात प्रथमच मांडला (जेंव्हा निसर्गापासून मनुवाद्यांनी माणसाला तोडून जनावरांच्याही पलीकडे नेले होते तेंव्हा ).
आणि याच सिद्धांताला प्रमाण आणि आदर्श मानून 16 व्या शतकाच्या सुरुवातीला येथील जगातील विशेषकरुन इंग्लंडमधील संशोधकांनी वैज्ञानिक प्रयोगाला सुरुवात केली.आणि पाहता पाहता गेल्या 500 वर्षात या विज्ञानाच्या प्रगतीने आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात आणून ठेवले आणि जे लोकं अजूनही आंधळ्याप्रमाणे देवावर विश्वास ठेऊन अनितीची कामे करतात,ती मंडळी सुद्धा याच वैज्ञानिकांनी संशोधन केलेल्या मोबाईल,इंटरनेट,मोटारगाड्या, रेल्वे,विमान,या साधनाचा वापर करतात.आणि वरून हे सुद्धा भोंगळ ज्ञानाचे डोस पाजतात की आमच्या देवांनी यांना बुद्धी दिली म्हणून तर यांनी संशोधन केले!
अरे देवांनी तुलाही बुद्धी दिली होती ना?
असो एकंदरीत वास्तव हेच आहे की,विज्ञानाने जी प्रगती केली आहे आणि जी करणार आहेत.त्यावर विश्वास ठेऊन सोबतच आपल्यातील विज्ञानवाद + विवेकवाद =मानवतावाद जागृत करुन डोळसपणे श्रद्धावान होऊन विवेकवादी बनून….
“माणूस,बनण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्यासाठीच आपला प्रत्येकाचा जन्म आपल्या माता – पित्याच्या पोटी झालेला आहे. हे स्वतःला चिमटा घेऊन ओळखण्याची प्रथम पायरी आहे.
हीच अपेक्षा आपल्या देशातील आणि विश्वातील तत्ववेत्त्यांनी, महापुरुषांनी, क्रांतीकारकांनी आपल्याकडून व्यक्त केली होती…..
( भाग -2 उद्याच्या भागात….)
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर,7875452689…