अर्धवट कामाने नागरिक त्रस्त,ठेकेदाराचा मनमानी कारभार,:- गणेश येरमे यांचा आरोप…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

    चिमूर तालुक्यातील मौजा कोलारा तुकम येथे सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत मनेरगा अन्वये अनेक महिन्यापासुन नियोजीत जागेकरीता प्लेवर ब्लॉक ( गटू ) मंजुर असतांनी सुद्धा,संबंधीत कंत्राटदार उडवाउडवीचे उतर देऊन ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थाननची दिशाभुल करीत आहे.

        कामाबदल अनेकदा सरपंच आणि सदस्यांनी बाधकाम विभाग कार्यालयात जावून निवेदन दिले.परंतु निवेदनाची दखल घेतली जात नाही.नियोजीत जागेवर काही दिवसातच मॉ मानिका परिसरात कार्यक्रम आहे.

       तर श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे तुकडोजी महाराज यांची पूण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.संबंधीत गुरुदेव मंडळातील संचालक-पदाधिकारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याला विचार करीत असतात.

         दोन्ही कार्यक्रम अगदी जवळ आले आहेत.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी संबंधीत कत्राटदारावर कार्यवाही करून त्याला दिलेला कंत्राट रद करण्यासंबंधाने ग्रामपंचायत सरपंच यांनी पत्र दिले आहे..

****

      “गटू च्या संबंधात बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना अनेकदा विचारणा केली तर निधी उपलब्ध नसल्याचे कारणे सांगुन ते उडवाउडवीचे उतर देतात.

          मग निधीच उपलब्ध नाही तर नियोजीत जागेवर १/१ गटूच्या गाडीचा निधी कसाकाय आला? नियोजीत जागेवर १ गाडी आणून ग्रामस्थांची दिशाभुल कंत्राटदार आणि बांधकाम विभाग करीत आहे,हे आता लक्षात आलय…