युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
दर्यापूर शहरातील नामवंत प्रबोधन प्राथमिक शाळा येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
“कीर्तनी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी” असे रोखठोक पणे आपल्या किर्तनातून सांगणारे,दुबळे अनाथ अपंगाचे सेवा करणारे थोर संत गाडगेबाबांचे विचार आजच्या मानवाला खरंच शरमेने निच्छीतच मान खाली झुकवणारे आहेत.
या कार्यक्रमांमध्ये शाळेच्या वर्ग एक ते चार च्या विद्यार्थ्यांनी गाडगे बाबांच्या जीवनावर भाषणे देऊन “देव माणसात शोधा” असा संदेश देणारे विचार आपल्या भाषणात व्यक्त केले.
वर्ग ४ चा विद्यार्थी अमरजीत संतोष कोल्हे व वर्ग २ चा विद्यार्थी वंश धुर्वे यांनी गाडगे बाबाच्या वेशात येऊन कीर्तन करून बाबांचे थोर विचार मांडले कार्यक्रम अध्यक्ष स्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु. करूणा इंगळे होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार स्पंदन टेकाडे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी सृष्टी गवळी हिने केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ अंबिका ताई कोल्हे होत्या तर ज्येष्ठ शिक्षिका कु. सुसतकर, जाधव, मनीष आगाशे विशाल आगाशे राम जऊळकार,शामल आगलावे शुभांगी लानोले, उपासी कळसकर,किरण बर्डेकर सुनीता सवाईकर इत्यादी उपस्थित होते.