युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
राहुल व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती द्वारा संचालित असलेल्या मिलिंद विद्यालय गौरखेडा (चांदई )येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए बी वानखडे हे होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिपक कावरे ,प्रशांत वानखडे, कु.मनिषा गावंडे,वासुदेव भांडे,चित्रा राऊत हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संत गाडगे बाबा यांच्या जिवनावर भाषणे दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वासुदेव भांडे यांनी पार पाडले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बोबडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता.