ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली :- नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे नंदलाल पाटील यांचे थोरले बंधू ,जनसंघाचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय श्यामराव बापू कापगते यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यालयात छोटेखानी कार्यक्रम करण्यात आले.
सुरुवातीला स्वर्गीय शामराव बापू कापगते यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापिका रसिका बी.कापगते यांचे हस्ते करण्यात आले तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित प्राध्यापक के.जी. लोथे, प्राध्यापिका स्वाती गहाणे, डी.एस. बोरकर, एम.एम.कापगते यांनी सुद्धा स्वर्गीय शामराव बापू यांना आदरांजली वाहिली.
याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक के.जी. लोथे सर यांनी आपल्या मनोगतातून स्व.शामराव बापू कापगते यांच्या विविध आठवणींना उजाळा देत जनसंघ ते भाजपा आणि अन्य क्षेत्रातील पाटील साहेबांची वाटचाल, त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाच्या पाढा वाचून त्यांचे आयुष्य खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असल्याचे मत प्राध्यापक लोथे सर यांनी व्यक्त केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापिका रसिका बी कापगते म्हणाल्या, स्व. श्यामराव बापू यांनी आपल्या इच्छाशक्ती व व्यापक दूरदृष्टीतून समाजाच्या कल्याणासाठी स्वतःला वाहून घेतले, राजकारणाचा कोणताही वसा-वारसा पाठींशी नसताना स्वकर्तृत्वावर लोकमानसात आपले अविस्मरणीय स्थान निर्माण केले, राजकारणात संयमी व रोखठोक कार्यपद्धती आणि आपल्या नेतृत्व शैलीने जन माणसांचे प्रश्न सोडवण्याचे सातत्याने प्रयत्न करायचे म्हणून आजही विदर्भातील राजकीय पुढाऱ्यांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे,असे मार्मिक विचार मुख्याध्यापिका यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन आर व्ही दिघोरे सर यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.