शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील आम्रवन दिक्षाभूमी सुगतकुटी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही १६/१७,डिसेंबरला धम्मदेशनेचा आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडलाय.
या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित असतात.त्यांना पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये म्हणून भीम आर्मी,(भारत एकता मिशन) पदाधिकाऱ्यांच्या द्वारे स्वच्छ पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्यां पदाधिकाऱ्यांत सुमित गजभिये,अजय गजभिये,शुभम गजभिये,निखिल रामटेके,अंकित दैवले,सागर बोरकर,दिक्षांत शेंडे,वेदांत गजभिये,आर्यन मेश्राम,चिराग पाटील,हर्षल गजभिये,पियुष वरखडे,वेदांत बोरकर,तेजस शेंडे,नैतिक पाटील,प्रशिक बहादुरे,निलेश आत्राम,यांचा समावेश होता.
याचबरोबर आजाद समाज पार्टीचे चिमूर तालुका अध्यक्ष अमीत भिमटे यांचे पाणीपुरवठा व पाणी वाटप उपक्रमाला मोलाचे योगदान आणि सहकार्य मिळाले.