महिला न्याय परिषदेत सहभागी व्हावे यासाठी हार्दिक निमंत्रण…  — महिला न्याय परिषद अध्यक्षा सविता ताई सोनवणे कदम यांनी दिले सस्नेह निमंत्रण..‌

महिला न्याय परिषद रूपरेषा…

      १) पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान मिळाले आहे. 

२) भारतामध्ये अविवेकी मनुस्मृती कायद्याने स्त्रियांवर कडक बंधने लादली.

३) मनुस्मृती ने स्त्रियांना शिक्षण,सत्ता संपत्तीचे अधिकार नाकारले.

४) बाल विवाह,सती प्रथा,हुंडा प्रथा सारख्या अन्यायकारक चालीरीती मुळे स्त्रियांचे संपूर्ण आयुष्य करपून टाकले..

       म.ज्योतिबा फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजाराम मोहन रॉय सारख्या समाज सुधारकांनी स्त्री स्वांतंत्र्याच्या चळवळी उभ्या केल्या.

      ब्रिटिशांनी याची दखल घेऊन अनेक वाईट झालेली ती बंद करण्यासाठी कठोर कायदे केले.

      सामाजिक विषमतेचे विषारी मूळ मनुस्मृती आहे,हे जाणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे तिचे जाहीर दहन केले.हाच दिवस भारतीय महिला स्वातंत्र्य दिवस मुक्रर झाला.भारतीय राज्य घटनेने मनुस्मृती चा पूर्ण नायनाट केला आहे व देशात समता बंधुता आणि न्यायाची प्रस्थापना झाली आहे.

        “लाथाडा धर्माने दिलेले दुय्यम स्थान स्वीकारा संविधानाने केलेला महिलांचा मान सन्मान” 

        या विषयावर एक दिवसीय महिला परिषद संविधान प्रचारक आद.आनंदा होवाल (इंडियन्स सोशल मुव्हमेंट संस्थापक) आणि आद.भगवान अवघडे संविधान लोकजागर परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली आहे.

***

स्थळ — डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल मुंबई…

दिनांक २५ डिसेंबर बुधवार

वेळ :– सकाळी 11.00 ते 4.00..

******

              आयोजक 

                 प्रकाश कदम..

                     नरेश परदेशी…

                            8169903726

******

      आपली स्नेहांकित 

    सविता ताई सोनावणे कदम 

           अध्यक्ष इंडियन्स सोशल मुव्हमेंट 

                       संविधान प्रचारक…