उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
बोगस बांधकाम करुन भरपूर रुपये कमावण्याचे साधन ठेकेदारी झाली आहे.अशा ठेकदारीला संबंधित विभागाचे अभियंता सुध्दा सहकार्य करतात.
बांधकाम योग्य झाले नाही तरी चालेल,पण कंत्राटदाराची हुजरेगिरी करण्याची कार्यपद्धत नेहमी सुरु राहिली पाहिजे हे बांधकाम विभागाचे ब्रिद झाले आहे.
जेवढे बोगस काम,तेवढी मलाई जास्त हे सुद्धा आता रुढ झाले आहे.यामुळे शासकीय बांधकामात मनाची मुजोरी सुरु झाली आहे.जनाच्या भावनांचे यांना काही सोयरसुतक नाही.
चिमूर तालुक्यातील मौजा शिवरा येथील सभागृहाचे बांधकाम बोगस होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे का म्हणून दुर्लक्ष होत आहे?याचे उत्तर शिवरा येथील नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिले पाहिजे.
तद्वतच सदर सभागृहाचे बांधकाम दुसऱ्यांदा करण्यात आले पाहिजे,असे शिवरा येथील नागरिकांचे म्हणणे आहे.