ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली :- जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मंजूर होऊन या वर्षी त्याला सुरवात होत झाले ही गौरवाची बाब असून याबाबत आजाद समाज पार्टीच्या वतीने भेट घेऊन मेडिकल महाविद्यालय प्रशासकाचे अभिनंदन केले आणि महाविद्यालयात सद्या होत असलेल्या पदभरती बाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदभरती प्रक्रिया सुरु असून BVG private limited या एजेन्सी कडे हा टेंडर देण्यात आला आहे. 649 पदांची एकूण भरती असून 32 पदे आतापर्यंत भरण्यात आली व जवळपास 600 पदे अद्याप भरायचे बाकी असल्याचे महाविद्यालयाचे प्रशासक डॉ. अविनाश टेकाडे यांनी सांगितले.
भरती संदर्भात जाहिरात प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला असता शासनाचे वरच्या स्तरावरून ते करार केले आहेत व आम्हाला तसें काही आदेश किंवा अधिकार नाहीत असे डॉ. टेकाडे यांनी सांगितलं.
BVG कंपनी च्या वतीने विपुल मस्के हे जिल्ह्यातील भरती प्रक्रिया सांभाळत असल्याचे सांगण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की पदभरती मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुद्धा चालू आहे अशी चर्चा चालू असून ही बाब अतिशय गंभीर आहे. जर असे काही घडत असेल तर तातडीने ते थांबवून त्याबाबत खुलासा करून भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी. मागणी आजाद समाज पार्टीने केली. प्रशासक डॉ. टेकाडे यांचेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले.
जर गैरव्यवहार झाले असे आमच्या निदर्शनात आले तर याचे परिणाम फार गंभीर होतील.असा इशारा आजाद समाज पक्षाचे अध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, कार्याध्यक्ष विनोद मडावी, संघटक हंसराज उराडे, तालूका सचिव नितेश वेस्कडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, पत्रकार चक्रधर मेश्राम उपस्थित होते.