संविधान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत कलह निर्माण करण्याची अतिशयोक्ती सहन करण्यापलीकडे झाली तर अतिशयोक्ती करणाऱ्यांसाठी भारत देशात जागा राहणार नाही?

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

          अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी भारत देशातील तमाम नागरिकांना आंदोलन करण्याची वेळ,”आर.एस.एस. आणि भाजपाने,आणली असल्याचे संकेत दिसू लागले आहेत.

         “भारतीय संविधानाचा विरोध करीत भारत देशातील नागरिकांच्या सर्वोच्च हिताला नाकारुन,खाजगीकरणाला महत्व देणारी भाजपा व त्यांच्या कुटनितीला सहकार्य करणारे बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीस कुमार,आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू,आणि इतर पक्षप्रमुखांना देशातील नागरिकांच्या रक्षणाचे व उन्नतीचे काहीच देणेघेणे नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे.

            संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशातील तमाम नागरिकांचा उध्दारकर्ता होय व देशातील तमाम नागरिकांना मनुस्मृतीच्या जुलमी राजवटीतून बाहेर काढीत उच्चवर्णीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करणारा मुक्तीदाता होय आणि,”भारतीय संविधानाच्या माध्यमातून,सर्व नागरिकांना हक्कातंर्गत अधिकार बहाल करणारा रक्षणकर्ता होय!..

           हे भाजपा आणि आर.एस.एस.ओळखून असल्याने त्यांच्या द्वारेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनादर केला जातोय,अपमान केला जातोय हे आता उघड झाले आहे.

        भाजपा आणि आर.एस.एस.या देशातील नागरिकांना वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या मुद्द्यांना अनुसरून वारंवार मुर्ख बनवतय आणि प्रसंगावधान हुकुमशाही कार्यपद्धत लागू करण्याचे षडयंत्र सुरु ठेवतय,हे आता लपून राहिलेले नाही.

           भारत देशातील बहुसंख्य नागरिकांना राजकारणाची आणि समाजकारणाची यशस्वी तथा त्यांच्यावर वारंवार आघात करणारी परिभाषा अजूनही कळलेली नाही.

      यामुळे भाजपा आणि आर.एस.एस.आपले हुकुमशाही असे धर्मवादी विचार बहुजन समाजातील नागरिकांवर थोपविण्यास यशस्वी होत आहे.

         मात्र,भारत देशातील जागरुक आणि सतर्क तत्ववेत्ता,अभ्यासू व संवेदनशील नागरिक,कर्तव्यदक्ष खासदार,आमदार,पत्रकार, वार्ताहर हे स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी व संरक्षणासाठी सदैव आपापल्या परीने संघर्ष करीत असल्याने भाजपाच्या आणि आर.एस.एस.च्या लोक विरोधी मनसुब्यांचे पितळ नेहमी उघडे पडले आहे.

         या देशातील स्वातंत्र्यप्राप्त धुरीनांचे देशातील नागरिकांच्या हितासाठी व रक्षणासाठी जे योगदान आहे हे कुणालाही नाकारता येत नाही.पण,१५० वर्षाची इंग्रज राजवट उलथून पाडल्यानंतरही मनुस्मृतीच्या कायद्याची महाभयंकर जुल्मी व अत्याचारी गुलामी कायम होती.

         मनुस्मृतीची गुलामी तर इंग्रज राजवटी पेक्षाही खतरणाक होती.हा काळाकुट्ट इतिहास देशातील नागरिकांना सांगण्याची हिंमत भाजपा आणि आर.एस.एस.चे प्रमुख कधीच करणार नाही.

         इंग्रजांच्या राजवटीला उलथून पाडणाऱ्या इतिहासिक संघर्षाला जेवढे महत्त्व आहे त्याहीपेक्षा या देशातील बहुसंख्य बहुजन समाजातील नागरिकांना मनुस्मृतीच्या गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंडकरांच्या संघर्षमय योगदानाला अमूल्य व अनन्यसाधारण महत्त्व आहे हेही समजून घेणे आवश्यक आहे.

         स्वातंत्र्य धुरीनांनी १५० वर्षाची इंग्रजी राजवट उलथून टाकली पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती अन्वये धार्मिक कायद्यांतर्गतच्या महाभयंकर जुल्मी व अत्याचारी अशा २ हजार ५०० वर्षाच्या गुलामगिरीला उलथून टाकले आणि या देशातील बहुसंख्य बहुजन समाजातील नागरिकांना मुक्त केले.

                आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातील सर्व नागरिकांचे रक्षण आणि संरक्षण केले आणि अधिकारांन्वये हक्क बहाल केले.हेच भाजपाला आणि आर.एस.एस.ला नेहमी खूपते आहे.

             म्हणूनच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांद्वारे,मंत्रांद्वारे, आणि आर.एस.एस.च्या सुत्रधारांकडून किंवा त्यांच्या इतरेत्र प्रमुखांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर शाब्दिक हल्ला सातत्याने केला जातोय.

           देशातील तमाम नागरिकांचा उध्दारकर्ता असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत अपमान सहन करण्याची मर्यादा जेव्हा संपलेली असेल,तेव्हा देशातील नागरिक भाजपा आणि आर.एस.एस.विरोधात महाभयंकर उठाव करतील आणि त्यांना भारतात राहण्यासाठी जागा सुध्दा मिळणार नाही,हे भाकीत वर्तविण्यास हरकत नाही.

          देशात अनर्थ घटना घडू नये म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांचे व खासदारांचे वर्तन वेळीच सुधारलेले बरे!