रोटरी क्लबचा उत्सव मेळावा स्थगित.. — पुढची तारीख लवकरच जाहीर होणार..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

   भद्रावती,दि.१९:-येथील रोटरी क्लब तर्फे येथील तालुका क्रीडा संकुलाच्या भव्य पटांगणावर दि.२० ते २५ डिसेंबर पर्यंत आयोजित रोटरी उत्सव मेळावा स्थगित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी पत्रपरिषदेत दिली.

       पत्रपरिषदेत बोलताना धानोरकर यांनी सांगितले की, रोटरी उत्सव मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली होती.आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या होत्या.तसेच आवश्यक ते शुल्क सुद्धा भरण्यात आले होते.

        परंतु काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे दि.२० डिसेंबर पासून मेळावा सुरू करणे शक्य नाही.मेळाव्यात लोकांच्या मनोरंजनासाठी असणारे झुले आणि इतर मनोरंजनाची साधने अनेक तालुक्यांत रोटरी उत्सव मेळावे सुरू असल्याने उपलब्ध होऊ शकले नाही. 

         त्यामुळे सदर रोटरी उत्सव मेळावा पुढे ढकलण्यात येत असून त्याची पुढची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही धानोरकर म्हणाले.

        पत्रपरिषदेला भद्रावती रोटरी क्लबचे अध्यक्ष किशोर खंडाळकर,सदस्य सुनील पोटदुखे आणि डॉ.ज्ञानेश हटवार उपस्थित होते.