RSS / मोदी – शहाचे 2029 पर्यंत संविधान आणि लोकशाही 100% संपविण्याचे षडयंत्र….. — आम्ही भारताचे लोकं केवळ बघतच बसणार का…..?

RSS / मोदी – शहाचे 2029 पर्यंत संविधान आणि लोकशाही 100% संपविण्याचे षडयंत्र…..

— आम्ही भारताचे लोकं केवळ बघतच बसणार का…..?

         होय आम्ही बघतच बसणार…….

                कारण……..

     माझं कुटुंब आणि घर आज मला सुरक्षित वाटते. मला भौतिक सुखाची आजच्या दिवसापूरती रेलचेल आहे. मी उद्याची, मित्रांची,शेजाऱ्यांची, थोडक्यात इतरांची चिंता का करू?..

       राजकीय नेत्यांसमोर लाचार होऊन माझ्या समस्या सूटण्याची परवाची स्वप्ने दिसत असतील तर मी त्यांची मानसिक गुलामी पत्करली तर काय बिघडलं.,….?

            गेल्या 75 वर्षापूर्वी हा भारत देश चांगला होता की जो त्या इंग्रजांच्या गुलामीत होता. निदान पेशवाईच्या गुलामीपेक्षा इंग्रज कितीतरी पटीने चांगलेच होते. कारण एकवेळ राजकीय आक्रमणकर्ते देशाला कंटाळून सोडून जातील…………..

          परंतू ,

कू. सांस्कृतिक आक्रमणकर्ते ( कूटनितीचे RSS वादी ) मात्र प्रत्येक काळात संधी मिळताच डोके वर काढण्याचा प्रयत्न सर्व शक्तिनीशी प्रयत्न केल्याशिवाय राहत नाही.

        हाच संपूर्ण ताकदीनीशी प्रयत्न 2014 पासून याच RSS / मोदी -शहाने केला आहे आणि आज 2024 च्या लोकसभा आणि इतर विधानसभा निवडणुकीतून त्यांनी तो सिद्ध केला आहे…….!

            कदाचित…………

 आता 2029 च्या लोकसभा निवडणूका सुद्धा होणार नाहीत……!

           कारण..,…….

      विरोधी पक्ष राहिलाच नाही. असलाच तर लुळा – पांगळाच आहे. तो सुद्धा आमच्याप्रमाणे हतबल होऊन हात चोळीत बसण्याशिवाय काहीही करू शकत नाही.

            आणि विशेष कारण म्हणजे गेल्या 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका निवडणूक आयोगाने (केंद्र व राज्य सरकारांनी) घेतल्या नाहीत ……..

       तर कोण उठाव केला?

 कोण रस्त्यावर उतरलं……?

कोणत्या विरोधी पक्षांनी जनतेला जागृत करण्यासाठी या विरोधात रान उठविले…,.?

        म्हणून जर 2029 च्या लोकसभेच्या आणि इतर राज्यांच्या निवडणुका झाल्याच नाही तर कदाचित आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. कदाचित लोकसभेचा कार्यकाळ 5 वरून 10 वर्षाचा पाशवी बहुमताच्या आधारे सुद्धा करतील. याचेही आश्चर्य वाटण्याचे काही कारण असूच शकत नाही.

           कारण…,.

  आम्ही भारताचे लोक…….

 स्वतःप्रत अधिनियमित करुन अंगीकृत करत आहोत.

        वरील प्रतिज्ञा आम्ही ( भारताचे लोकं ) केवळ पोपटपंची सारखे शाळेतून विद्यार्थ्यांच्या तोंडून वदवून घेण्याच्या पलीकडे आमची मजल कधी गेलीच नाही.

           आमच्या शिक्षक प्राध्यापकांनी सुद्धा साडी, माडी आणि गाडीच्या स्वार्थी संस्कृतीच्या बाहेर डोकावून संविधानक्रांतीला बघण्याचा कधी प्रयत्न केलाच नाही. कारण सर्वकाही विनाकष्टाने मोफत मिळाल्याने त्याचे महत्व शून्यच असते……..!

          म्हणून, ही जी गुलामीची मानसिकता येथील जनतेची गेल्या 75 वर्षात झालेली आहे. त्याचे मूळ कारण हे पेशवाईच्या काळातील मनुस्मृतीच्या गुलामीत दडलेले आहे. म्हणून आमच्यावर येथील RSS /मोदी -शहा हवी करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. 2014 पासून कोरोनाच्या गतीने आम्ही पुन्हा त्या मनुस्मृतीचे गुलाम बनण्यासाठी वाहत जात आहोत………

         आपण देशात बोटावर मोजण्याइतके संविधानवादी, लोकशाहीवादी, तत्वनिष्ठ तळमळीचे असलेले कार्यकर्ते या कृत्रिम प्रवाहात वाहत जाणार का……?

    का केवळ स्वतःलाच वाचवण्याचा प्रयत्न करणार……?

       का इतरांनाही वाचवण्याचा प्रयत्न करणार……..?

     का बाबासाहेबांची लेकरं गटागटात फडफड करुन षंढ म्हणूनच निपजणार का……?

          या प्रश्नाचे उत्तर मी वयक्तिक जबाबदारी घेऊन उद्याच्या भागात देणार……….

         तुम्ही………….

           आवाहनकर्ता 

            अनंत केरबाजी भवरे

 संविधान विश्लेषक, औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689..