शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला आज शुभारंभ होणार… — ब्रम्हपुरीच्या तालुका क्रीडा संकुलनात रंगणार स्पर्धातील रोमहर्षक विजय-पराजय…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

   शुभम गजभिये 

     विशेष प्रतिनिधी 

         ब्रम्हपुरी…

       अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीत आज थाटात प्रारंभ होणार आहे.

        सायंकाळी ५ वाजता क्रीडा स्पर्धाचे उध्दघाटन गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.नामदेव किरसान करणार आहेत.

       या स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर असणार आहेत.

     तर प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.अभिजित वंजारी, विधानपरिषद शिक्षक मतदार संघ नागपूरचे आमदार सुधाकर आडबले,महाराष्ट्र राज्य माजी विधानसभा विरोधी पक्षनेते तथा माजी मंत्री आमदार विजयभाऊ वडेट्टीवार,चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडीया,भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

          सन २४-२५ च्या अनुषंगाने १९ डिसेंबरला शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला ब्रम्हपुरी येथील तालुका क्रीडा संकुलनात प्रारंभ होणार असल्याने या स्पर्धांचा रोमहर्षक विजय-पाराजय बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.