शिवरा सभागृहाच्या निकृष्ट बांधकामाकडे संबंधित अभियंत्याचे लक्ष केव्हा जाणार?… — भाग – २..

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक

        शिवरा येथे सभागृहाचे बांधकाम सुरु असून सदर सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची ओरड स्थानिक नागरिकांची असताना संबंधित देखरेख अभियंता अनभिज्ञ कसे आहेत?हा प्रश्न उपस्थित होतो आहे.

           कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागभिड व उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर यांच्या स्तरावरुन शिवरा येथील सभागृहाचे बांधकाम मंजूर झाले असून सदर सभागृहाच्या बांधकामाची अंदाजे किंमत २४ लाख २७ हजार ८१५ रुपये आहे.

                शिवरा येथील सभागृहाच्या बांधकामाची देखरेख साहाय्यक अभियंता विश्वजीत सरकार यांच्याकडे असल्याची माहिती आहे.त्यांच्या सोबत भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता चुकीचा नंबर असल्याचे ते सांगतात..

            चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत नागभिड तालुका ठिकाण येत असून या शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय आहे तर चिमूर तालुका ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग विभाग कार्यालय आहे.

           या दोन्ही कार्यालयांतर्गत अनुभव नसलेल्या ठेकेदारांना विविध बांधकामाचे कंत्राट दिले जात असल्याचे बोलले जात आहे.

             चिमूर तालुकातंर्गत मौजा शिवरा येथे सभागृहाचे सुरू असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असताना संबंधित अभियंता शांत व चूप का आहेत?हेच कळायला मार्ग नाही.

         सभागृहाच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत संबंधित अभियंता चूप व शांत असल्याने त्यांची सभागृहाच्या निकृष्ट बांधकामाला संमती आहे काय?