विद्यार्थ्यांना ज्ञानाचा कंदील द्या,प्रकाश आपोआप समोर जाईल :- केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

भद्रावती दि.18:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिपरी (दे.) येथे ढोरवासा केंद्राची सहावी शिक्षण परिषद नुकतीच घेण्यात आली.

        तालुक्याचे प्रेरणास्थान डाॅ.प्रकाश महाकाळकर,गट शिक्षणाधिकारी पं.स.भद्रावती यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक केंद्रप्रमुख श्री.भारतजी गायकवाड यांनी शिक्षण परिषद पार पाडली.

          कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दामोधर दोहतरे सर प्राचार्य कर्मवीर विद्यालय गवराळा उपस्थित होते.

              तथा कार्यक्रमाचे उदघाटन अमोल क्षिरसागर, शा.व्य.स.अध्यक्ष यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हनुन मुख्या. मशारकर सर, मुख्या. सौ बन्सोड मॅडम लाभल्या होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन करून कार्यक्रमाला विधिवत सुरुवात झाली.

       त्यानंतर दमके सर यांनी बुद्ध गीताने कार्यक्रमाला बहार आणली शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने स्वागत केले.त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन मान्य वरांचे स्वागत झाले.भारतजी गायकवाड सर यांनी प्रास्ताविकेची सुरुवात करत वातावरण निर्मिती केली.

       

        यात त्यांनी बुद्धाची शिकवण आज काळाची गरज आहे, एकविसाव्या शतकातील कौशल्ये मुलांमध्ये रुजवणे आज गरजेचे आहे, भविष्यवेधी शिक्षण देऊन आज मुलांना जगात ओळख करून घ्या असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

        तालुकास्तरीय विनोबा ऍप विजेते श्री संतोष निकुंबे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

         उदघाटनीय भाषणात अमोल क्षीरसागर यांनी गुरूंनी राष्ट्रसंतांसारखा आपला आदर्श विद्यार्थ्यांनसमोर ठेवावा तरच राष्ट्राची प्रगती होईल असे सांगितले तर अध्यक्षीय भाषणात श्री दोहतरे सर यांनी पिपरी शाळेचे कौतुक करून पुढील होणाऱ्या नवरत्न स्पर्धेसाठी मुलांना बक्षीस जाहीर करून प्रोत्साहन दिले.

         निपुण भारत अंतर्गत मूलभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान यावर प्रकाश टाकताना तज्ञ मार्गदर्शिका सौ. वनिता बल्की मॅडम व सौ.साधना उपगन्लावर मॅडम यांनी मराठी साहित्य भेटीची ओळख व अध्यापनामध्ये वापर कसे करावे हे प्रत्यक्ष कृतीद्वारे समजावून सांगितले.

         त्यानंतर कु. माधुरी चिंचोलकर मॅडम व कु.संध्या भडके मॅडम यांनी गणित व इंग्रजी शैक्षणिक साहित्याची ओळख मांडणी व उपयोगाबद्दल मार्गदर्शन केले.

          लगेच श्री भास्कर गेडाम सर व श्री संतोष निकुंबे सर यांनी माहितीचा अधिकार मार्गदर्शन यावर सर्विस्तर प्रकाश टाकला. शिक्षण परिषदेचे संचालन श्री. अनिल भगत सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री मशारकर सर सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.