सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळण्याकरिता भद्रावतीत सामुदायिक प्रार्थना… — भद्रनाग स्वामी मंदिर, साईबाबा मंदिर येथे समर्थकांचे साकडे..

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        विकास पुरुष सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री पद देण्यात आलेले नाही. त्यामुळे हजारो, लाखो समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

          चंद्रपूर जिल्ह्यातून सुधीर भाऊ सतत सातव्यांना निवडून आले आहेत.आजपर्यंत त्यांना ज्या खात्याचे मंत्रिमंडळ मिळाले त्या संधीचे त्यांनी सोने करून दाखवले आहे. मग यावेळी सुधीर भाऊंना का डावलण्यात आले हा प्रश्न समर्थकांना पडला आहे.

         सुधीर भाऊ यांना मंत्रिमंडळात मंत्रीपद देण्यात यावे ,तसेच पालकमंत्री पद देण्यात यावे यासाठी भद्रावती येथील प्रसिद्ध भद्रनाग स्वामी महाराज मंदिर, श्री साईबाबा मंदिर येथे समर्थकांतर्फे सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.

         यावेळी समस्त धार्मिक संघटना, सर्वपक्षीय नागरिक, गुरुदेव भक्त, गुरुदेव सेवा मंडळ यांच्यातर्फे सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.

        याप्रसंगी भद्रावती येथील चंद्रकांत गुंडावार , झनक चौधरी ,प्रकाश माकोडे, मधुकर सावनकर, नरेश बोरसरे, नितीन लांजेवार , सचिन सरपटवार ,रूपचंद धारणे, प्रफुल वाटे, सिकंदर शेख , पप्पू शेख, सुरज पेंदाम, प्रीतम देवतळे, प्रवीण नागपुरे, शाहीद सय्यद ,विशाल ठेंगणे, प्रवीण लोणकर, नाना हजारे, राजुरकर सर, आकोजवार सर त्यासोबतच असंख्य सर्वपक्षीय नागरिक उपस्थित होते.