केंद्रीय गृहमंत्री अमीत शहांचे ते राज्यसभेतील वक्तव्य उपोरक्तच!,आणि अपमान करणारे!.. — युगप्रवर्तक,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची उंची गाठणारे भारतात अजूनही कुणी जन्माला आलेले नाही.

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

           काल राज्यसभेत गृहमंत्री अमीत शहा यांच्या द्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबत करण्यात आलेले वक्तव्य हे उपरोक्त व मानहानी करणारे आहे हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे.

           संविधानाला अनुसरून चर्चा दरम्यान राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी,”अभी फॅशन हो गया है,आंबेडकर,आंबेडकर,आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो सात जन्मों तक स्वर्ग मिल जाता।,अशा प्रकारच्या वाक्याचा केलेला उपयोग हाच,”उपरोक्त आणि अपमानास्पद आहे,हे लक्षात घेतले पाहिजे.

           केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वरील वाक्यानंतर काय बोललेत हे अजिबात महत्वाचे नाही.देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांनी अभ्यास पुर्ण मांडणी संविधानाबद्दल व देशातील नागरिकांबाबत करणे आवश्यक होते.

         मात्र त्यांनी वैचारिक तोल जाणिवपूर्वक घसरवला.या अयोग्य वैचारिक तोलात जगप्रसिद्ध महाप्रकांड पंडित, युगपुरुष,जगमान्य महान थोर समाजसुधारक,महान तत्त्ववेत्ता, जगविख्यात अर्थतज्ञ,भारताचे शिल्पकार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमाना बरोबरच त्यांना काँग्रेस पक्षाचे चिमटे काढायचे होते हे त्यांच्या वक्तव्याला अनुसरून स्पष्ट आहे.

          मनुस्मृतीच्या काळ्या आणि जुल्मी कायद्याला अनुसरून २ हजार ५०० वर्षांपर्यंत या देशातील बहुसंख्य बहुजन समाजातील नागरिकांवर सहन करण्यापलीकडचे निच वृत्ती व निच विकृती अन्वये अत्याचार उच्चवर्णीयांकडून केल्या जात होते,सर्व प्रकारचे हक्क त्यांच्या द्वारे नाकारले गेले होते,त्यावेळी या देशातील ३३ करोड देवांनी सुध्दा या देशातील सर्व नागरिकांचे,महिलांचे उज्वल भविष्य कधीही घडविले नाही किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार कधीच रोखले नाही.आणि या देशातील महिला भगिनींवरील व नागरिकांवरील होणारे अत्याचार थांबविण्यासाठी,”साक्षात कोणतेही देव,कधीच धर्तीवर उतरले नाही हे वास्तव केंद्रिय गृहमंत्री अमीत शहांना माहीत नाही काय?

           या देशातील ओबीसी,एससी,एसटी,अल्पसंख्याक आणि इतर नागरिकांच्या संरक्षणासाठी,हक्कासाठी आणि हितासाठी बोधिसत्व,संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाच या धर्तीवर जन्म घ्यावा लागलाय हा इतिहास बोलतो आहे.

           विश्वरत्न डॉ‌.बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व प्रकारच्या इतिहासीक संघर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्यासह या देशातील तमाम नागरिकांना मानसन्मानाचे,स्वाभिमानाचे दिवस बघायला मिळाले आहेत आणि या देशातील सर्व नागरिकांना त्यांच्यामुळेच सर्व प्रकारच्या हक्कांचे अधिकार प्राप्त झाले आहेत हे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा एवढ्या लवकर विसरलेत काय?

          “कुठला स्वर्ग आणि कशा पद्धतीचा स्वर्ग? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कधी प्रत्यक्ष पाहिला आहे काय? त्यांनी जर प्रत्यक्ष स्वर्ग बघितला नसेल तर ते कोणत्या स्वर्गावर बोलतात?

         काल्पनिक बांबीचा प्रोपोगंडा करुन अंधश्रद्धा पसरवणे हे मनुवादी विचारसरणीला माणणाऱ्यांचे नित्याचे काम आहे.अंध्दश्रध्दा कायम ठेवल्याशिवाय उच्चवर्णीयांना आपले वर्चस्व बहुजन समाजातील नागरिकांवर कायम ठेवता येत नाही हे अनेक घटना क्रमांनी अधोरेखित केले आहे.आजही अंधश्रद्धा पसरवणारी कृती सरकारच्या संरक्षणात केली जात आहे हे सत्य आहे.

           केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी अनेकदा विचार करायला हवा कि धर्म ग्रंथांच्या किंवा जातीधर्माच्या बलावर ते केंद्रीय गृहमंत्री झाले नाही तर भारतीय संविधानामुळेच झाले..‌.

           दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोज मंगळवारच्या राज्यसभेतील त्यांच्या उपोरोक्त वक्तव्यांचा जेवढा निषेध केला तेवढा कमीच आहे…

          त्यांनी जगप्रसिद्ध महामानवाचा उपोरोक्त वक्तव्यांच्या आधारे राज्यसभेत धडधडीत केलेला अपमान त्यांचे भविष्य अंधकारमय बनविणारा ठरणार आहे,हे एक वास्तव असेल.