दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : वारकरी संप्रदायातील प.पु. गुरुवर्य वैकुंठवासी वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष विठ्ठल महाराज चौधरी (मोठे बाबा) यांच्या चौदाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हभप रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या प्रेरणेने वै.पांडुरंग काटे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरुवर्य.वै.विठ्ठल महाराज चौधरी “वारकरी सेवा पुरस्कार” महाराष्ट्रातील ज्येष्ठ किर्तनकार व रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांना शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ५१ हजार रुपये, पुर्ण पोशाख, फेटा, मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी जगन्नाथ आप्पा काटे, मुखेकर महाराज शास्री, रामकृष्णदास महाराज लहवितकर, बाजीराव नाना चंदीले, पद्माकर महाराज पाटोळे, परमेश्वर महाराज जायभाये, उमेश महाराज दशरथे, नरहरी महाराज चौधरी, डि.डि.भोसले पाटील, तुकाराम महाराज मुळीक, आबा महाराज गोडसे, सुनिल चौधरी, अजित वडगावकर, अनिल तापकीर आदि मान्यवर उपस्थित होते.
वारकरी शिक्षण संस्था नसती तर आम्ही नसतो आज आम्ही जे काही आहोत ते फक्त वारकरी शिक्षण संस्थे मुळे आहोत तसेच पिंपळे सोदागर येथे मधुकरी साठी जात असो त्यामुळे हा पुरस्कार आईचाच पुरस्कार आहे असे मनोगत हभप रामराव महाराज ढोक व्यक्त केले. यावेळी शांतीब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांनी आशिर्वाद दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी तर सुत्रसंचालन नरहरी महाराज चौधरी यांनी केले.