विरांगणा मुक्ताई जयंती व नागदिवाळी महोत्सव…  — २१ व २२ डिसेंबरला मौजा पळसगांव (पिपर्डा),ला पार पडणार जयंती व मोहत्सव कार्यक्रम…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

      विरांगणा मुक्ताई जयंती व नागदिवाळी महोत्सवाचे आयोजन चिमूर तालुक्यातील मौजा पळसगाव येथे करण्यात आले आहे.

      दिनांक २१ व २२ डिसेंबर रोजी होणाऱ्या विरांगणा मुक्ताई जयंतीला आणि नागदिवाळी मोहोत्सवाला सर्व समाज बांधवांनी आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करण्यासंबंधाने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

       कार्यक्रमाची रुपरेषा अशी असणार आहे..

        शनिवार दिनांक २१/१२/२०२४

घटस्थापना व मुक्ताई पुजन ग्रामशाखा पळसगांव (पि) चे जेष्ठ समाज बांधव यांचे हस्ते होणार असून डायका वादन सायं ६ ते ९ वाजता होणार आहे..

          रात्रौ ९ ते २ वाजतापर्यंत जागृती भजन गुरुदेव भजन मंडळ पळसगांव,गुरुदेव भजन मंडळ करबडा,खातोडा,गुरुदेव भजन मंडळ म्हसली,श्री. नवयुवक भजन मंडळ कन्हाळगांव,गुरुदेव भजन मंडळ गोंडमोहाळी (सो.) गुरुदेव भजन मंडळ बेलारा,गुरुदेव भजन मंडळ वाघेडा,गुरुमाऊली वारकरी भजन मंडळ उसेगाव,मंजुळामाता भजन मंडळ बेलारा,यांच्या द्वारे जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

         रविवार दिनांक २२/१२/२०२४

सकाळी ७ ते ९ वा.माँ माणिकादेवी मुक्ताई,विर बिरसा मुंडा यांचे प्रतिमेची मिरवणुक गावातील मुख्य मार्गानी काढण्यात येणार आहे.यात गावातील नागरिकांसह गुरुदेव भजन मंडळ पळसगांव,गुरुदेव भजन मंडळ करबडा,यांचा सहभाग असणार आहे.

      दुपारी १.०० वा. मान्यवरांचे समाज प्रबोधन,समाजावर येणाऱ्या अडचणी आणि संघटन या विषयावर मार्गदर्शन सायं ४ ते ६ वाजता पर्यंत होणार आहे.यानंतर गोपालकाला व महाप्रसाद होणार आहे.

        कार्यक्रमाचे 

उद्घाटक डॉ.रमेशकुमार गजभे माजी राज्यमंत्री (म.रा.) हे असणार आहेत तर कार्यक्रमाचे अतिथी म्हणून विजयकुमार घरत सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,प्रा.डॉ.दिनकर चौधरी कला वाणिज्य महाविद्यालय भिसी,सह उद्घाटक प्रकाश वाकडे माजी सभापती प.स. चिमूर,अध्यक्ष परसराम नन्नावरे विहीरगांव,उपाध्यक्ष धनराज गुळधे शिक्षक चिमूर,माया नन्नावरे सदस्या,गीता कारमेंगे करबडा पं स सदस्या,खाटे सर पळसगांव,श्रीरामे सर,मंगेश धाडसे उपसभापती चिमूर (खांबाडा),बरडे सर आदीवासी आश्रम शाळा पळसगांव,भारत जांभुळे करबडा,गजानन गुळधे ग्रामपंचायत सरपंच सातारा,डॉ. गजभे खांबाडा हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

      विशेष पाहुणे म्हणून सरीता गुरनुले ग्रामपंचायत सरपंच पळसगांव,तुळसिदास शेरकुरे उपसरपंच पळसगांव,दुमदेव बोरकर वन समिती अध्यक्ष पळसगांव,संजय सोनेकर तंटामुक्ती अध्यक्ष पळसगांव,रागिना दडमल पोलीस पाटील पळसगांव,वर्षा लोणारकर पं.स.सदस्या,वसंत दडमल (सभापती) हे असणार आहेत.

        माना आदिम जमात मंडळ मुंबई ग्राम शाखा पळसगांव,आदिवासी माना जमात विद्यार्थी युवक संघटना ग्राम शाखा-पळसगांव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.